Mahhi Vij : घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान माही विजने उचललं मोठं पाऊल, 9 वर्षांनी..
Mahhi Vij : टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसून त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. याचदरम्यान माही विजने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे, बऱ्याच मराठी, हिंदी कलाकरांच्या लग्नातील मदतभेद, त्यांचं एकमेकांशी न पटल्यामुळे वेगळ होण या गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या. हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडपं असलेले अभिनेता जय भानुशाली (Jay Bahnushali) आणि अभिनेत्री माही विज (Mahhi vij) यांच्यातल्या कुरबुरींच्या बातम्या बऱ्याच चर्चेत होत्या, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. जय व माही यांचं नातं तुटत असून ते कायदेशीररित्या वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत, अशा अनेक बातम्या समोर आल्याने त्यांचे चाहते चिंतेत पडले. मात्र जय किंवा माही या दोघांपैकी कोणीच त्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
असं असलं तरी त्यांच्या नात्याबद्दल, घटस्फोटाबद्दलची बातमी एक साईटवर आली व त्यांच्या सोशल मीडिया पेजवरही ती पोस्ट होती, तेव्हा माहीने मौन सोडत पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली होती. अपवा पसरवू नका, मी कायदेशीर कारवाई करेन असा इशाराच माहीने दिला होता.
याचदरम्यान आता माहीबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच माही विजने एक मोठा निर्णय घेतला आहे, पण तो तिच्या खासगी आयुष्याबद्दल नसून तिच्या कामाबद्दल आहे. तिने चाहत्यांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. माही विज ही तब्बल 9 वर्षांनी टीव्ही इंटस्ट्रीमध्ये पुनरागमन करत आहेत.
अभिनेत्रीने तिच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्लॉगमधून चाहत्यांशी ही गुड न्यूज शेअर केली आणि टीव्ही इंडस्ट्री पुन्हा काम करणार असल्यातचेही नमूद केलं. 9 वर्षांच्या ब्रेकनंतर माही आता ‘सहर होने को है’ या कलर्सच्या शोमध्ये दिसणार आहे. तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये माहीने सांगितलं की, ती लवकरच तिच्या नवीन प्रोजेक्टचे शूटिंग सुरू करणार आहे. या नव्या शोमध्ये ती एका टीनएजनरच्या आईची भूमिका साकारणार आहे असं सांगत तिने सेटची एक झलकही चाहत्यांसोबत शेअर केली.
या सिरीयलमधून कमबॅक
माही विज तिच्या व्लॉगमध्ये म्हणाली, “आम्ही लखनौमध्ये उरलेल्या काही दृश्यांचे काम पूर्ण करत आहोत. आज आम्ही काही पॅचवर्क करणार आहोत. माझ्या मुलांना मागे सोडल्याबद्दल मला अपराधी वाटत आहे. जेव्हा मला (टीव्हीवर) परत यायचंहोतं तेव्हा चांगलं काम मिळत नव्हतं आणि इन्स्टाग्राममधून माझी चांगली कमाई होत होती. पण मला पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रातच यायचं होतं ” असं माहीने नमूद केलं.
Mahhi Vij-Jay Bhanushali : जय भानुशालीशी घटस्फोट ? माही विजने सोडलं मौन, म्हणाली- मी कायदेशीर..
जय भानुशालीने दिलं महागडं गिफ्ट
अलिकडेच, अनेक बातम्या समोर आल्या होत्या की 14 वर्षांच्या संसारानंतर माही आणि जय वेगळे होत आहेत. काहींनी असा दावाही केला होता की अभिनेत्री माही विजने तिच्या पतीकडून 5 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. पण माहीने या सर्व बातम्या फेटाळूव लावल्या. आता तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये जयने दिलेल्या गिफ्टचाही माहीने उल्लेख केला. जयने तिच्यासाठी जपानहून क्रिश्चियन डियोरची लिपस्टिक आणली आहे असं माही विजने सांगितलं.
जय भानुशाली आणि माही विज यांनी 2011 साली लग्न केले आणि 2017 साली त्यांनी दोन दत्तक मुले झाली. 2019 साली त्यांच्या तारा या लाडक्या लेकीचा जन्म झाला.
