Mahhi Vij-Jay Bhanushali : जय भानुशालीशी घटस्फोट ? माही विजने सोडलं मौन, म्हणाली- मी कायदेशीर..
Mahhi Vij reacts to divorce rumours with Jay Bhanushali : टीव्ही अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांचं कपल खूप लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या समोर येत आहेत. ते कायदेशीररित्या विभक्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर माही विज हिने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

टीव्ही जगतातील लोकप्रिय कपल, अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) आणि अभिनेता जय भानुशाली (Jay BhanuShali) हे त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचं नातं तुटल्याची धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. लग्नाच्या 14 वर्षानंतर जय आणि माही हे दोघं विभक्त झाले आहेत, अशा अनेक चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही त्यांच्याबद्दलच्या बातम्या मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. त्यावर आत्तापर्यंत दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता अभिनेत्री माही विजने घटस्फोटाच्या वृत्तावर मौन सोडत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं ‘खोट नरेटिव्ह’ असल्यातं सांगत माहीने कायदेशीर कारवाईचा थेट इशारा दिला आहे.
अलिकडेच, एका इंस्टाग्राम पेजवर दावा करण्यात आला होता की, अभिनेता जय भानुशाली आणि माही यांनी जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. शिवाय, त्यांच्या तीन मुलांचा ताबा कुणाकडे असेल तेही निश्चित करण्यात आल्याचं त्यात नमूद केलं होतं. मात्र याच पोस्टवर आता माहीने कमेंट केली आहे. “खोट्या बातम्या पसरवू नका. मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन.” असा इशाराच तिने दिला आहे. पाहात पाहता तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला.
View this post on Instagram
माहीची प्रतिक्रिया

काय होता रिपोर्ट ?
हिंदुस्तान टाईम्समधील एका वृत्तानुसार, माही आणि जय यांच्या नात्यात बराच काळापासून खटपट सुरू होती, समस्या होती आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता असा दावा करण्यात आला. सूत्रांचा हवाला देऊन रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आलं की ” (नातं वाचवण्यासाठी) खूप प्रयत्न केले, पण काहीही बदललं नाही.” माही विजच्या ट्र्स्ट इश्यूजमुळे दोघांमधील दरी वाढत गेली, असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटल होतं.
2011 साली झालं लग्न
जय भानुशाली आणि माही विज यांचे 2011 साली लग्न झालं. त्यांना तीन मुलं आहेत: मुलगी तारा हिचा जन्म 2019 साली झाला. तर राजवीर आणि खुशी, या दोघांना त्यांनी 2017 साली दत्तक घेतलं.
