प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; तिच्यावर का आली भीक मागायची वेळ?
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीक मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नारायणी शास्त्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गाणं गात भीक मागताना दिसून येत आहे. नारायणीची अशी अवस्था पाहून नेटकऱ्यांनाही मोठा धक्का बसला. व्हायरल व्हिडीओमध्ये ती डफली वाजवत, गाणं गात भीक मागताना दिसली. नारायणीला अशा अवस्थेत ओळखणंही कठीण झालं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय आहे व्हिडीओचं सत्य?
नारायणीने खोटे सफेद केस आणि दाढी लावून स्वत:चा वेश इतका बदलला आहे की तिला कोणी ओळखूही शकत नाही. भिकारी बनलेल्या नारायणीसमोर एक भांडंसुद्धा आहे, ज्यामध्ये काही नाणी आणि नोटा आहेत. एका दारासमोर ती घोंगडीवर बसून आपल्याच धुंदीत गाणं गातेय. ‘मी माझं प्रोफेशन कधीही बदलू शकते’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. यापुढे तिने म्हटलंय, ‘खरं सांगायचं झालं तर मला माझ्या कामाच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वाधिक आवडते. मी कधीही कोणासारखीही बनू शकते.’ नारायणीचा हा अनोखा अंदाज पाहून काही चाहत्यांना हसू अनावर झालं आहे.
View this post on Instagram
नारायणीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या ‘नोयोनतारा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यामध्ये ती दुहेरी भूमिकेत आहे. त्याआधी तिने ‘पिया रंगरेज’, ‘आपकी नजरों ने’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नारायणीने ‘क्यूंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेत केसर अनुपम कपाडियाची भूमिका साकारली होती. तर ‘पिया का घर’, ‘नमक हराम’, ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘नजर’ यांमध्ये विविध भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. नारायणी तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होती. सहअभिनेता गौरव चोप्रासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनी ‘नच बलिये 2’ या डान्स शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. परंतु ब्रेकअपनंतर 2015 मध्ये तिने स्टीव्हन ग्रेवरशी लग्न केलं. नारायणीने डीडी नॅशनलवर प्रसारित होणाऱ्या ‘कहानी सात फेरों की’ या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती विविध लोकप्रिय मालिकांमध्ये झळकू लागली.
