सिगरेटचे चटके, कायम मारहाण, पहिल्या नवऱ्यासोबत अभिनेत्रींचं खडतर आयुष्य; म्हणाली, रात्री नशेत यायचा आणि…
Actress Personal Life: अभिनेत्री गरोदर असताना पहिल्या नवऱ्याने अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध, एकीने तर अभिनेत्रीला दिलेली ॲसीड हल्ल्याची धमकी. प्रसिद्ध अभिनेत्रीचं खडतर आयुष्य..., म्हणाली, 'रात्री नशेत यायचा आणि...', अभिनेत्री कायम असते चर्चेत....

Actress Personal Life: झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पडद्यावर अभिनेत्री राज्य करतात पण खऱ्या आयुष्यात मात्र अनेक चढ – उतारांचा सामना अभिनेत्री करत असतात. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. अशात त्यांना कधी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेताच आला नाही. असंच काही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्यासोबत देखील झालं आहे. खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता.
श्वेता तिवारी हिचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. श्वेताने पहिल्या नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामुळे घरातील कोर्टापर्यंत पोहोचले. अखेर लेक पलक तिवारी हिच्या जन्मानंतर श्वेता तिवारी हिने राजा चौधरी याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली होती, ‘तो (राजा चौधरी) रात्री 3 वाजता नशेत घरी यायचा. शिव्या द्यायचा आणि घरातील सामानाची तोडफोड करायचा… मी गरोदर होती आणि त्याची बहीण शालू हिचं लग्न होतं, म्हणून मी सासरी मेरठ येथे गेली होती.’
‘मला कळलं होतं की, राजा ज्यूनियर अभिनेत्रींच्या आणि मॉडेल्सच्या फार जवळ जात होता. राजा बहिणीच्या लग्नात माझ्यासोबत आला आणि शालूच्या मैत्रिणीसोबत अधिक बोलू-फिरू लागला. मी त्याला गच्चीत आणलं आणि विचारलं काय करत आहेस? तेव्हा राजाने मला जोरात कानशिलात लगावली. ज्यामुळे मी खाली जमीनीवर पडली.’
View this post on Instagram
पुढे श्वेता म्हणाली, ‘माला, सोना, मुखर्जी… देवाला माहिती किती मुलींसोबत राजाचे प्रेमसंबंध होते. एकीने तर मला ॲसीड हल्ल्याची देखील धमकी दिली होती. खूप काही सहन केलंय. त्याने सिगरेटने माझ्या हाताला चटके दिले आहेत. भिंतींवर मला जोरात आपटलं आहे.’
‘त्याने पलक हिला देखील धमकी दिली होती. तू एक वर्ष आणखी मोठी हो तुला तर मी संपवेल… पलक स्वतःच्या बापाला प्रचंड घाबरायची. नेहमी रात्री उशिरा घरी यायचा. दारु प्यायलेला असायचा… त्याची मानसिक स्थिती स्थिर नव्हती…’ असं देखील श्वेताने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
