AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीने Kiss केलं तर ठीक, पण अफेअर.. तारक मेहता फेम अभिनेत्रीचं शॉकिंग वक्तव्य

टीव्ही अभिनेत्री सिंपल कौलने इंटिमेटदृश्यांबद्दल आपली स्पष्ट मते मांडली आहेत. तिच्या मते, कलाकारांसाठी किसिंग किंवा इंटिमेट सीन्स हे केवळ कामाचा भाग आहेत आणि तिच्या पतीला असे दृश्य करावे लागले तरी तिला अडचण नाही. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील फसवणूक ती कधीही सहन करणार नाही असं ती म्हणाली.

पतीने Kiss केलं तर ठीक, पण अफेअर.. तारक मेहता फेम अभिनेत्रीचं शॉकिंग वक्तव्य
Actress Simple Kaul
| Updated on: Jul 03, 2026 | 1:28 PM
Share

टीव्ही अभिनेत्री सिम्पल कौल हिने किसिंग आणि इंटिमेट (जिव्हाळ्याच्या) दृश्यांबाबत आपली मते मोकळेपणाने मांडली. तिने सांगितले की, तिच्या पतीला अशी दृश्ये करावी लागली तर तिला काहीच अडचण नाही, परंतु नात्यातील फसवणूक ती कधीही सहन करणार नाही.

आजकाल चित्रपट आणि मालिकांमध्ये चुंबनाचे दृश्य शूट करणं हे खूप सामान्य मानलं जातं. असं असलं तरीही अशा दृश्यांमुळे अनेकदा वाद निर्माण होतात आणि काही वेळा त्यामुळे नातेसंबंधही संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होते. आता यावर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सिंपल कौल हिने इंटिमेट सीन्स आणि किसिंग सीन यावर आपली मतं मांडली आहेत. तिच्या मते, कलाकारांसाठी अशी दृश्ये हा केवळ कामाचा एक भाग असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याशी त्याचा संबंध जोडला जाऊ नये.

किसिंग सीन करावा लागला तर..

अभिनय हा एक व्यवसाय आहे आणि कथेची जी काही गरज असेल, त्यानुसार कलाकाराला काम करावं लागतं, असं एका न्यूज एजन्सीशी बोलताना सिंपल कौलने सांगितलं. “जर एखादा अभिनेता किसींग सीन किंवा इंटिमेट सीन करत असेल, तर तेव्हा तो फक्त आपलं काम करत असतो. जर माझ्या पतीने किंवा जोडीदाराने व्यावसायिक दृष्टिकोनातून असं एखादं दृश्य साकारलं, तर मला त्याबद्दल काहीच अडचण वाटणार नाही; कारण ते केवळ त्यांचं काम आहे याची मला कल्पना आहे” असं सिंपल म्हणाली.

पण अफेअर चालणार नाही

हा फक्त कामाचा भाग असतो असं तिने स्पष्ट केलं. पण ऑनस्क्रीन इंटिमसी आणि खरं आयुष्य, त्यातील नाती यांच्यात फरक असतो. “जर एखादी व्यक्ती खरोखरच दुसऱ्या कोणासोबत राहण्यासाठी आपल्या नात्याबाहेर पाऊल टाकत असेल, तर ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मी त्या गोष्टीला कधीच योग्य मानणार नाही.” असं ती पुढे म्हणाली. “फसवणूक म्हणजे फसवणूकच; तिला दुसरी कोणतीही व्याख्या नाही. जर दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतील, तर त्यांनी प्रामाणिक आणि निष्ठावान राहिले पाहिजे.” असंही नात्यांमधील विश्वास आणि निष्ठेबद्दल बोलताना सिंपल कौल म्हणाली.

कमिटमेंट नको असेल तर आधीच सांगायचं ना

जर एखाद्याला नात्यात कमिटमेंट नको असेल, तर त्याने ते वेळीच स्पष्ट केलेलं बकं, असं ती म्हणाली. जर नात्यात असताना भावना बदलल्या किंवा नवीन आकर्षण निर्माण झाले, तर ते लपवण्याऐवजी जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोलले पाहिजे; मात्र, कोणत्याही परिस्थितीत फसवणूक करणे समर्थनीय ठरू शकत नाही, असंही तिने पुढे नमूद केलं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंपल कौल ही ‘कुटुंब’, ‘शरारत’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘ओये जस्सी’, ‘यम हैं हम’, ‘दिल्ली वाली ठाकूर गुर्ल्स’ आणि ‘जिद्दी दिल माने ना’ यासारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये तिने काम केलं होतं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा