Akshay Kumar: अक्षय कुमारच्या मुलानंतर आता लेकीचा व्हिडीओ व्हायरल; पहिल्यांदाच लपवला नाही चेहरा

आलिशान गाड्या सोडून ट्विंकल खन्नाने केला रिक्षातून प्रवास; मुलगी निताराला पाहून चाहते खुश!

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या मुलानंतर आता लेकीचा व्हिडीओ व्हायरल; पहिल्यांदाच लपवला नाही चेहरा
Akshay Kumar: अक्षय कुमारच्या मुलानंतर आता लेकीचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 10:20 AM

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमारच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबई एअरपोर्टवर आरवला पाहिलं गेलं आणि पापाराझींनी त्याचा व्हिडीओ अपलोड करताच तो क्षणार्धात व्हायरल झाला. आरवनंतर आता अक्षयच्या मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या व्हिडीओत मुलगी निताराचा चेहरा पहायला मिळतोय. अक्षय आणि ट्विंकल यांनी आजपर्यंत सोशल मीडियावर निताराचे असेच फोटो पोस्ट केले, ज्यात तिचा चेहरा पहायला मिळणार नाही. मात्र पापाराझींनी काढलेल्या या व्हिडीओत निताराचा चेहरा स्पष्ट पहायला मिळतोय.

अक्षय आणि ट्विंकलकडे तर बऱ्याच आलिशान गाड्या आहेत. मात्र रविवारी ट्विंकल आणि निताराने ऑटोरिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. रिक्षामध्ये बसल्यानंतर नितारा तिच्या आईला काहीतरी सांगत असते. ते ऐकून ट्विंकल तिला म्हणते, “चांगलं झालं”.

हे सुद्धा वाचा

मायलेकीचा हा व्हिडीओ पापाराझी शूट करत होते, म्हणून रिक्षाचालक तसाच थांबला होता. ते पाहून ट्विंकल त्याला हसत म्हणते, “चलो भैय्या, तुम्ही वाट पाहताय”. हे ऐकून नितारासुद्धा हसू लागते.

यावेळी ट्विंकलने मल्टी-कलर ड्रेस परिधान केला होता. तर निताराने जांभळ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स घातले होते. यावेळी ट्विंकलच्या हातात एक बॅग आणि पुस्तक होतं.

नितारा ही अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची छोटी मुलगी आहे. 2001 मध्ये ट्विंकलने अभिनयाला रामराम केला. त्यानंतर 2015 पासून ती लेखन करू लागली. तिने आतापर्यंत काही पुस्तकं लिहिली आहेत. तर एका वर्तमानपत्रातही ती लेख लिहिते.

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये जॅकलिन फर्नांडिसने त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्याचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.