AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Miss Universe 2023: ट्रान्सवुमन पहिल्यांदा रचणार मोठा इतिहास; ‘त्या’ नक्की असं करणार तरी काय?

Miss Universe 2023: तृतीयपंथींना अडचणींचा सामना करावा लागतो. पण आपल्या जिद्दीने काही ट्रान्सजेंडर्सनी आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. आता दोन ट्रान्सवुमन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र ट्रान्सवुमन यांची चर्चा... दोघी असं करणार तरी काय?

Miss Universe 2023: ट्रान्सवुमन पहिल्यांदा रचणार मोठा इतिहास; 'त्या' नक्की असं करणार तरी काय?
| Updated on: Oct 15, 2023 | 11:58 AM
Share

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : समाजात आजही अशा काही गोष्टी आहेत, ज्या आजही लोकांना स्वीकारायला कठीण जातात.. त्यांपैकी एक म्हणजे तृतीयपंथी.. समाजात तृतीयपंथी (Transgenders) व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचितच आहे. अनेक ठिकाणी तृतीयपंथींना अडचणींचा सामना करावा लागतो. पण आपल्या जिद्दीने काही ट्रान्सजेंडर्सनी आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता देखील दोन ट्रान्सवुमन (Transwoman) ची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सध्या ज्या ट्रान्सवुमनची चर्चा रंगत आहेत, त्या दोघी पहिल्यांदा मोठा इतिहास रचणार आहेत. तर त्या नक्की काय करणार आहेत जाणून घेवू..

लवकरच “मिस युनिव्हर्स 2023 ” (Miss Univwerse 2023) सुरु होणार आहे. २१ व्या “मिस युनिव्हर्स 2023 ” मधील स्पर्धकांची सध्या तुफान चर्चा रगंली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा प्रत्येक अर्थाने खास असणार आहे. कारण कधीही न घडलेली घडना यंदाच्या “मिस युनिव्हर्स 2023 ” मध्ये घडणार आहे. यावेळी ‘मिस युनिव्हर्स’मध्ये स्पर्धक म्हणून दोन ट्रान्सवुमन मरिना माचेटे आणि रिक्की कोल सहभागी होणार आहेत.

ट्रान्सवुमन रिक्की कोल

ट्रान्सवुमन रिक्की कोले हिने नुकताच ‘मिस नेदरलँड्स 2023’चा किताब जिंकला आहे. नेदरलँड येथील ब्रेडा याठिकाणी राहाणारी मॉडेल रिक्की व्हॅलेरी कोले LGBTQ अधिकार कार्यकर्ती आहे. रिक्की फक्त २२ वर्षांची आहे. ‘क्वीर समुदायासाठी आवाज आणि त्याच्यासाठी आदर्श बनण्याची इच्छा रिक्की हिने व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि रिक्की हिची चर्चा रंगत आहेत.

ट्रान्सवुमन मरिना माचेटे

ट्रान्सवुमन मरिना माचेटे (Marina Machete) देखील तुफान चर्चेत आहे. वयाच्या २८ व्य वर्षी मरिना माचेटे हिने Miss Portugalचा किताब जिंकला आहे. या स्पर्धेदरम्यान तिला सर्वात आत्मविश्वासी स्पर्धक म्हटलं गेलं. ‘ट्रान्सजेंडर असल्याने मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबीयांनी मला नेहमीच साथ दिली.’ असं मरिना माचेटे एका मुलाखतीत म्हणाली.

दरम्यान, यंदाच्या “मिस युनिव्हर्स 2023 ” (Miss Univwerse 2023) स्पर्धेत दोन दोन ट्रान्सवुमन सहभागी होणार असल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. अशात जर दोघींपैकी एकीने “मिस युनिव्हर्स 2023 ” च्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं तर ही गोष्ट ऐतिहासिक असणार आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...