AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरळ उभा राहा, मीडियाचं सर्व लक्ष … शिक्षा सुनावताच थरथर कापू लागलेला संजय दत्त, उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याने तुरुंगवास भोगला आहे. पण तेव्हा परिस्थिती नेमकी कशी होती? याबद्दल कधी कोणती गोष्ट समोर आलीच नाही. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी मोठा खुलासा केला.

सरळ उभा राहा, मीडियाचं सर्व लक्ष ... शिक्षा सुनावताच थरथर कापू लागलेला संजय दत्त, उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा
Ujjwal Nikam - Sanjay Dutt
| Updated on: Jul 14, 2026 | 8:25 AM
Share

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकातील काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्री अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक सेलिब्रिटींचे अंडरवर्ल्डसोबत खास कनेक्शन देखील होते. यामध्ये अभिनेता संजय दत्त देखील होता. जेव्हा अंडरवर्ल्डशी संबंधित शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला अटक करण्यात आली, तेव्हा देशभरातील अनेक नामवंत वकिलांनी न्यायालयात त्याची बाजू मांडली. तरी देखील अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी संजय याला कोणत्याच प्रकारचा दिलासा देऊ नये… यासाठी मागणी केली. निकालाच्या दिवसाबद्दल सांगत निकम म्हणाले, ‘शिक्षा सुनावली तेव्हा संजय थरथर कापू लागलेला…’, नुकातच झालेल्या एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी मोठा खुलासा केला.

न्यायालयाकडे संजय दत्तला सात वर्षांची शिक्षा सुनावण्याची विनंती

निकम यांनी सांगितले की, संजय दत्तला Probation of Offenders Act लाभ मिळू नये, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला होता. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की, संजयला ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं; जरी त्याची कटाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असली, तरी बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता. त्यामुळे, त्यांनी न्यायालयाकडे सात वर्षांची शिक्षा ठोठावण्याची विनंती केली.

दाऊद इब्राहिमच्या शूटरकडून मिळालेले संजय दत्त याला शस्त्र…

उज्ज्वल निकम म्हणाले, ‘संजय दत्त याच्या वकिलांनी असा देखील युक्तीवाद केलेला की, हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे त्याला दिलासा मिळायला हवा..’ पण निकम यांनी यासाठी विरोध केला कारण, अभिनेत्याकडे जे शस्त्र आढळले होते, ते दाऊद इब्राहिमच्या शूटरकडून मिळालेले होते. निकम यांचं असं म्हणणं आहे की, एखाद्या व्यक्तीकडे दाऊद इब्राहिमच्या शूटरकडून शस्त्र येत असतील, तर त्या व्यक्तीचा क्रिमिनल रेकॉर्ड देखील पाहिला पाहिजे… एवढी मोठी चूक करणाऱ्या व्यक्तीकडे सामान्य व्यक्ती म्हणून राहिलं जाऊ शकत नाही.

‘संजय दत्त प्रचंड घाबरलेला आणि थरथर कापत होता… ‘

निकालाच्या दिवसाबद्दल सांगत निकम म्हणाले, ‘संजय प्रचंड घाबरलेला आणि थरथर कापत होता. सतत एकच म्हणत होता, मी काहीच चुकीचं केलं नाही, मी पुन्हा येईल…’, तेव्हा मी संजयला सांगितलं, ‘सरळ उभा राहा, मीडियाचं सर्व लक्ष तुझ्यावर आहे… तेव्हा त्याने स्वतःला सावरलं आणि सरळ उभा राहिला. त्यानंतर पोलिसांना सांगितलं, त्याला तुरुंगात घेऊन जा…’

आता कसे आहेत संजय दत्त आणि उज्ज्वल निकम यांचं संबंध

अखेरीस निकम यांनी सांगितल्यनुसार, आता संजय दत्त याच्यासोबत त्यांचे संबंध सामान्या आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोघे अनेकदा भेटले देखील आहे. निकम यांच्यानुसार, संजूबाबा त्यांचा आदर करतो, दोघांमध्ये आता कोणत्यात प्रकारचं शत्रुत्व नाही.

Follow Us
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट