AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी १८ तारखेला नागपूर निवडलं – संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 9:06 AM
Share

Maharashtra News LIVE Updates In Marathi: आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. वाखरी ते पंढरपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा चौपदरी महामार्ग पूर्ण झाल्याने वारकऱ्यांना प्रशस्त आणि स्वतंत्र मार्गिकेतून पायी चालत पंढरपुरात प्रवेश करता येणार आहे.

Maharashtra News LIVE: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी १८ तारखेला नागपूर निवडलं - संजय राऊत
tv9 live updatesImage Credit source: Tv9

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णीना अभय देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी अखेर महापालिकेकडून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125(A), 125(B), 3(5) या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगराचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2026 07:16 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी १८ तारखेला नागपूर निवडलं – संजय राऊत

    18 तारखेला नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी नागपूर निवडलं गेले आहे. रामरक्षा आंदोलन मुंबईतून सुरू केले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात उद्धव ठाकरे पोहोचले आहेत असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 14 Jul 2026 05:54 PM (IST)

    मुख्यमंत्री योगी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

  • 14 Jul 2026 05:45 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाचा सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास नकार

    सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले, “भाषा शिकणे कधीही वाया जात नाही.”

  • 14 Jul 2026 05:28 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीशीत काहीच तथ्य नाही- तटकरे

    सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष एकत्रित काम करत आहे. सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीशीत काहीच तथ्य नाही. कायदेशीर सल्ला घेऊन नोटीशीला उत्तर देऊ, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. राष्ट्रीय अध्यक्ष निवड अवैध असल्याची नोटीस दिली गेली आहे.सच्चिदानंद सिंह यांच्याकडून वकिलामार्फत नोटीस पाठवली गेली आहे.

  • 14 Jul 2026 05:16 PM (IST)

    नाशिक: कारचा पाठलाग करणाऱ्यांना ताब्यात घेतले

    नाशिकमध्ये समाजकंटकांच्या एका टोळक्याने एका कुटुंबाचा सुमारे 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.  या प्रकरणी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 14 Jul 2026 05:10 PM (IST)

    चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांचा जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार

    चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करणाऱ्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

  • 14 Jul 2026 04:54 PM (IST)

    जळगाव : अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

    जळगावच्या अमळनेर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निवेदन ठेवण्यात आलं. नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

  • 14 Jul 2026 04:40 PM (IST)

    इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

    इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्यभरात एकूण 29.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 51 हजार 313 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग 41.45 टक्क्यांसह अव्वल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 34.27 टक्के लागला आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

  • 14 Jul 2026 04:24 PM (IST)

    नाशिक : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे उद्यापासून अन्नत्याग आंदोलन

    नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे उद्यापासून कुटुंबासोबत अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्र्यांकडून आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

  • 14 Jul 2026 04:10 PM (IST)

    कल्याण : आधारवाडी कारागृहाच्या किचनमध्ये भीषण आग

    कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील किचनमध्ये अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. जेवण बनवताना अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत दोन कैदी भाजल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जखमी कैद्यांना तातडीने उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आगीच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

  • 14 Jul 2026 03:55 PM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून केली बीबीएफ पद्धतीने पेरणी

    सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून केली बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी केली आहे. नागठाणे, शेळकेवाडी, पाडळी आणि वरणे परिसरातील ‘फार्मर कप’मधील शेतकरी गटांना भेटी देऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शेतकरी महिलांसोबत संवाद साधला. यादरम्यान नागठाणे येथे स्वतः ट्रॅक्टर चालवून बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करत त्यांनी महिला शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला.

  • 14 Jul 2026 03:45 PM (IST)

    राज्य मंत्री मेघाना बोर्डिकर यांच्या मतदार संघात शिक्षण व्यवस्था कोलमडली

    परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जोगी तांडा गावात वर्ग पाचवी पर्यंत शाळा आहे. मात्र या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ना धड छत आहे. ना येथील व्यवस्था. शाळेतील वर्ग खोल्यावरील पत्रे उडून गेल्याने पहिली ते पाच वर्ग एकाच खोलीत भरवली जात आहेत. ज्या वर्ग खोलीवर पत्रे आहेत ते देखील गंजून खीळखिळे झाले आहेत.

  • 14 Jul 2026 03:30 PM (IST)

    अमरावतीत पावसाने घेतला ब्रेक, शेतकरी चिंताग्रस्त

    अमरावती मध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर अचानक कमी झाला आहे. पाऊस थांबल्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त असून, धरणांमध्येही पुरेसा जलसाठा नसल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सतत तीन चार दिवस अमरावतीसह विदर्भातील अन्य भागात पाऊस चांगला बरसला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.

  • 14 Jul 2026 03:15 PM (IST)

    पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून तेरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

    पालघर मध्ये रक्षकच बनला भक्षक.  पोलीस कर्मचाऱ्याकडून तेरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाला आहे. शेजारी राहणारी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी उसनवारीने पैसे मागण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गेली असता विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • 14 Jul 2026 03:00 PM (IST)

    देशव्यापी आंदोलनात ठाकरे पोळी भाजून घेत आहेत- एकनाथ शिंदे

    देशव्यापी आंदोलनातून ठाकरे त्यांची पोळी भाजून घेत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ठाकरे हे लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. ते वायचुंग यांच्यासोबत उपोषणाला का बसत नाही. घरातूनच का पाठिंबा देत आहेत, तुम लढो, हम कपडे संभालते अशी त्यांची परिस्थिती आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

  • 14 Jul 2026 02:50 PM (IST)

    निफाडच्या देवगावमध्ये पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक

    निफाडच्या देवगावमध्ये पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पीक विमा कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. सदोष पीक कापणी प्रयोग व हवामान केंद्रातील त्रुटींवर शेतकऱ्यांचा आरोप आहे. अपुरे मनुष्यबळ व तालुका कार्यालय नसल्याने शेतकरी वंचित असल्याचा दावा करण्यात आला. 20 जुलैला देवगाव येथे ‘सरण आंदोलन’ करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.

  • 14 Jul 2026 02:40 PM (IST)

    श्रेया फिरके या तरुणीचा गंभीर अपघात

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक गाडीच्या धक्क्यामुळे श्रेया फिरके या तरुणीचा गंभीर अपघात झाला. अपोलो हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या श्रेया आणि तिच्या पालकांची मनसे नेते गजानन काळे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. कोडगे मनपा प्रशासन अजूनही गंभीर नाही. घटनेनंतरही मनपाचा एकही वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात भेटीस गेला नाही. शिवाय, कंत्राटदारावर अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. आतापर्यंत झालेल्या १६ लाख रुपयांच्या बिलाची रक्कम पालकांनी अदा केली आहे…

  • 14 Jul 2026 02:30 PM (IST)

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 22 जुलै रोजी पुढील सुनावणी

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी केलेला अन् रिलाईड डॉक्युमेंट यादी मागणीचा अर्ज कोर्टाने ना मंजूर केला आहे. इतर दोन अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाला काही सूचना दिलेल्या आहेत. त्यावर पुढच्या तारखेला लेखी उत्तर देणार आहोत असं सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं.

  • 14 Jul 2026 02:20 PM (IST)

    मिरा-भाईंदर पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनविसेचे ‘अर्धनग्न आंदोलन’

    मिरा-भाईंदर पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनविसेचे आक्रमक ‘अर्धनग्न आंदोलन’करण्यात आले. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तके-गणवेश न मिळणे आणि सफाई कामगारांचे ४ महिन्यांचे पगार थकवल्याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधवांनी आयुक्तांशी चर्चा केली. फक्त राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आनंद दिघे चौकाची’ दुर्दशा आणि ‘अनधिकृत शाळांच्या’ गंभीर मुद्द्यावर आयुक्तांकडून दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले.

  • 14 Jul 2026 02:10 PM (IST)

    स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते जखमी

    जिंतूर महावितरण कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी महावितरणच्या कार्यालतील टाकीवरील छत कोसळल्याने आंदोलक टाकीत पडले. घटनेत दोन आंदोलक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 14 Jul 2026 02:00 PM (IST)

    अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

    शासनाकडून मंजूर असलेलं अप्पर तहसील कार्यालय जळगावच्या नशिराबाद येथे उभारण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. नशिराबाद येथील नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. नशिराबाद गाव ब्रिटिशकालीन असल्याने गावाला ऐतिहासिक वारसा असल्याकारणाने याच ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. जळगाव तालुक्यात नशिराबाद हे मध्यवर्ती ठिकाण आहे इतर महसूल मंडळातील ग्रामस्थांना देखील ते सोयीचं असून राष्ट्रीय महामार्ग लागत असल्याने सर्वांसाठी सोयीचा असल्याच ग्रामस्थांचा म्हणणं आहे.सर्व दृष्टीने सोयीचा असल्यामुळे शासनाकडून नशिराबाद गावाचा विचार व्हावा अशी आग्रही मागणी नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

  • 14 Jul 2026 01:50 PM (IST)

    कृषी विभागाच्या तपासणी पथकाला सूचना

    कृषी विभागाच्या तपासणी पथकाला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. भोकरदन तालुक्यातल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची माहिती.

  • 14 Jul 2026 01:40 PM (IST)

    शासनाकडून मंजूर असलेलं अप्पर तहसील कार्यालय जळगावच्या नशिराबाद येथे उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

    शासनाकडून मंजूर असलेलं अप्पर तहसील कार्यालय जळगावच्या नशिराबाद येथे उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. नशिराबाद येथील नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल आहे नशिराबाद गाव ब्रिटिशकालीन असल्याने गावाला ऐतिहासिक वारसा असल्याकारणाने याच ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगाव तालुक्यात नशिराबाद हे मध्यवर्ती ठिकाण आहे इतर महसूल मंडळातील ग्रामस्थांना देखील ते सोयीचं असून राष्ट्रीय महामार्ग लागत असल्याने सर्वांसाठी सोयीचा असल्याच ग्रामस्थांचा म्हणणं आहे. सर्व दृष्टीने सोयीचा असल्यामुळे शासनाकडून नशिराबाद गावाचा विचार व्हावा अशी आग्रही मागणी नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

  • 14 Jul 2026 01:30 PM (IST)

    कॅबिनेट बैठकीत देवेंद् फडणवीस यांच्या कार्यकाळाचं कौतूक

    सीएम फडणवीस यांना २४३१ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्याचं केले मनापासून अभिनंदन

  • 14 Jul 2026 01:20 PM (IST)

    कांदिवली सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरण, आमदार भातखळकरांची डीसीपींना भेट

    कांदिवलीतील नाबालिग विद्यार्थिनी सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज डीसीपी गजानन राजमाने यांची भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. भातखळकर यांनी या भेटीत तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून या घटनेबाबत चर्चा झाली आहे. सिद्धी विश्वकर्माच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारतर्फे विशेष वकील नेमण्यात येणार आहे आणि ते हे प्रकरण न्यायालयात लढतील.

  • 14 Jul 2026 01:10 PM (IST)

    कांदिवली सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरण, आमदार भातखळकरांची प्रतिक्रिया

    हनुमान नगर मध्ये मुलीची दुर्दैवी हत्या करण्यात आली त्या संदर्भात डीसीपीला भेटलो. डीसीपी कडे तीन चार प्रमुख मागण्या केलेलं आहे. पोस्को अंतर्गत कलमा लावले पाहिजे, आरोपीला फाशी दिली पाहिजे ही दुसरी मागणी केली, या प्रकरणांमध्ये विशेष वकील नियुक्त केला जावा मुख्यमंत्री सोबत फोनवर बोललो आहे.. त्यांनी सुद्धा तत्काल माझ्या या मागणीला मान्यता दिली आहे. या घटनेच्या 40 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केले जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल या दिशेने आम्ही प्रयत्न करतो.

  • 14 Jul 2026 01:00 PM (IST)

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी केलेला अन् रिलाईड डॉक्युमेंट यादी मागणीचा अर्ज कोर्टाने ना मंजूर केला आहे. इतर दोन अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाला काही सूचना दिलेल्या आहेत. त्यावर पुढच्या तारखेला लेखी उत्तर देणार आहोत असं सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं. तर निशाणी क्रमांक 211,12 आणि 13 या संदर्भात एकत्र चार्जशीट करता येत नाही. असा आरोपी पक्षाच्या वतीने जो अर्ज करण्यात आला होता. त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्या अर्जावर आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागण्यात आला त्यावर कोर्टाने पुढची तारीख 22 जुलै दिली अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

  • 14 Jul 2026 12:45 PM (IST)

    निफाडच्या देवगावमध्ये पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक

    निफाडच्या देवगावमध्ये पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक झालेत.  पीक विमा कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं. सदोष पीक कापणी प्रयोग व हवामान केंद्रातील त्रुटींवर शेतकऱ्यांचा आरोप आहे. अपुरे मनुष्यबळ व तालुका कार्यालय नसल्याने शेतकरी वंचित असल्याचा दावा करण्यात येत असून  20 जुलैला देवगाव येथे ‘सरण आंदोलन’ करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

  • 14 Jul 2026 12:34 PM (IST)

    केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आईचं पंतप्रधानांना भावनिक पत्र

    केतन अग्रवाल हत्याप्रकरणी वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींकडे न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर आता केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पत्र लिहिलं .

    “मला माझ्याच मुलासाठी न्याय मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावं लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. माझ्या मुलाची निर्घृण हत्या झाली आणि त्याच्यासोबत माझं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झालं,” अशी वेदना त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. “मला कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी विनंती त्यांनी केली.

  • 14 Jul 2026 12:26 PM (IST)

    सोलापुरातील 3 जणांवर ATS कडून कारवाई

    आंतरराष्ट्रीय संघटना आणि पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर ATS कडून कारवाई करण्यात आली.   तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर आलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी सोलापुरातील आरोपींचे आर्थिक संबंधित समोर आलेत.

    सोलापुरातील 3 आरोपींनी 10 कोटी 50 लाखाचा निधी आंतरराष्ट्रीय संघटनेला दिल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. आरोपींच्या मोबाईल मध्ये पाकिस्तानातील 70 पेक्षा अधिक लोकांचे नंबर तसेच 4 व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती सोलापूरचे मुख्य सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली.

  • 14 Jul 2026 12:13 PM (IST)

    पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर जाणार – विनायक राऊत

    आता आम्ही काही बोलणार नाही. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर जाणार.  आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.  कोणाला कुठे जायचे आहे त्यांना जाऊ दे. आम्ही anticipatory bail साठी  अर्ज केला आहे – विनायक राऊत यांनी दिली माहिती.

  • 14 Jul 2026 12:08 PM (IST)

    उल्हासनगरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा रुग्णालय पाहणी दौरा

    उल्हासनगरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा रुग्णालय पाहणी दौरा.  मंत्री प्रकाश आबिटकरांसह आरोग्य सुविधांची  पाहणी करणार.  दौरा संपताच डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना होणार आहेत.  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय चर्चा रंगली असून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शक्यता असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  • 14 Jul 2026 11:55 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

    जिल्ह्यातील 5 शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश, सुरू असलेल्या शाळांना प्रतिदिन 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर 5 पैकी काही शाळांचे विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून घरीच असून विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होतेय. मान्यता नसतानाही शाळा भरवल्याचा शिक्षण विभागाचा ठपका… या 5 शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे शिक्षण विभागाचे विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये या 5 शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

  • 14 Jul 2026 11:40 AM (IST)

    पावसाअभावी लातूर जिल्ह्यात 60 टक्के शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्या

    पावसाअभावी लातूर जिल्ह्यात 60 टक्के शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्या आहेत, ज्या 40 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिकं सुखायला सुरुवात झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातल्या 05 लाख 86 हजार हेक्टर क्षेत्रा पैकी केवळ 02 लाख 41 हजार क्षेत्रावर धूळ पेरणी झालेली आहे.

  • 14 Jul 2026 11:30 AM (IST)

    गोंदियाच्या गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील मातोश्री पांदन रस्त्यांचे कामात अनियमितता

    गोंदियाच्या गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील मातोश्री पांदन रस्त्यांचे कामात अनियमितता आहे. कामाचे देयके थांबवण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.

  • 14 Jul 2026 11:15 AM (IST)

    रमेश म्हात्रे पुन्हा हॅास्पिटल मध्ये दाखल, ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल

    ⁠उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे रमेश म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  काल रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याच बरोबर रमेश म्हात्रे यांनी जामिनाकरता अर्ज दिला होता. रमेश म्हात्रे आणि त्याच्या तीन अन्य साथीदाराच्या जामिनावर  कल्याण कोर्टात सुनावणी आज आहे. वैद्यकीय कारणांवर आधारीत जामिन द्यावा यासाठी  रमेश म्हात्रे यांनी कोर्टाला विनंती केली होती.

  • 14 Jul 2026 11:06 AM (IST)

    धावत्या लोकल रेल्वेमधून महिलेला धक्का देऊन केली हत्या…

    धावत्या लोकल रेल्वेमधून महिलेला धक्का देऊन हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे हत्या केली हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील गणखैरा येथील रेल्वे स्थानक परिसरात घडली घटना होती. छत्तीसगड राज्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

  • 14 Jul 2026 10:49 AM (IST)

    भाजप नागपुरात 22 जुलै रोजी महायज्ञ करणार

    ठाकरे गटाने नागपुरात राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली. ठाकरे गटाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही  एक मोठी घोषणा केली आहे. भाजप नागपुरात येत्या 22 जुलै रोजी महायज्ञ करणार आहे.

  • 14 Jul 2026 10:41 AM (IST)

    पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसची धाड

    पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसच्या पथकाने छापेमारी केली. पाकिस्तानी गँगस्टरशी संबंध आणि देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली. पुणे,पिंपरी चिंचवड दोन्ही शहरात मिळून २३ ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. तर राज्यात ६५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

  • 14 Jul 2026 10:27 AM (IST)

    देशात प्रामाणिकपणाला किंमत नाही; सोनम वांगचूक यांचा पंतप्रधान मोदींना संदेश

    दिल्लीतील जंतरमंतरवर मागील 15 दिवसांपासून सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके उपोषणाला बसले आहेत. या उपोषणादरम्यान सोनम वांगचूक यांनी पंतपप्रधान मोदींना मोठा संदेश दिला आहे. देशात प्रामाणिकपणाला किंमत नाही. परीक्षाच्या प्रश्नपत्रिकांपासून मतांपर्यंत सर्व विकले जात आहे, असं त्यांनी म्हटलं.

  • 14 Jul 2026 10:08 AM (IST)

    सोलापुरात वाळूमाफियांचा तरुणावर जीवघेणा हल्ला

    सोलापुरातील पंढरपुरात वाळू फामियांनी तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाळूमाफियांनी तरुणाला धारधार शस्त्र, काठीने जबर मारहाण केली .या मारहाणीत बालाजी नागटिळक हा तरुण गंभीर जखमी झाला आहे . त्याने अवैध वाळू उपशा विरोधात तक्रार केली म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 14 Jul 2026 09:50 AM (IST)

    कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

    सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून तुझ्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला, मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आराडा-ओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बाल-बाल बचावले आहेत.

  • 14 Jul 2026 09:40 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीतील वादाचे पडसाद आता थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत

    सणसवाडी येथील डोंगरवस्ती चौकात महिंद्रा थारने ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिल्याने चेतन हरगुडे आणि अथर्व हरगुडे हे दोघे गंभीर जखमी झाले. बैलगाडा शर्यतीतील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हा जीवघेणा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..

  • 14 Jul 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरात तरुणांकडून वडाची झाडे दोऱ्याच्या विळख्यातून मुक्त करण्याचा उपक्रम

    ऑपरेशन मोकळा श्वास अभियान राबवत शहरातील विविध वडाच्या झाडांचे दोरे काढून टाकण्यात आले. वडाच्या झाडाला दोरे असल्याने वटवाघुळ तसेच इतर पक्षांच्या अधिवासाला धोका असल्याची बाब समोर आली. त्यानंतर सोलापुरातील एकत्व फाउंडेशन या तरुणांच्या सामाजिक संघटनेने हा उपक्रम राबवला आहे. यावेळी झाडांभोवती साचलेले निर्माल्यही गोळा करून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

  • 14 Jul 2026 09:20 AM (IST)

    नालासोपा-यात एका तळीरामाचा भर रस्त्यात धिंगाणा

    धिंगाणा घालणाऱ्या दारुड्याला पकडून रिक्षात बसवीत असताना पोलिसांना ही धक्काबुकी आणि अश्लील शिवीगाळ तळीरामच्या भर रस्त्यातील धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नालासोपारा पश्चिम शनी मंदिर परिसरात सायंकाळ च्या सुमारास घडली घटना. दारूड्याला पकडून नालासोपारा पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 14 Jul 2026 09:05 AM (IST)

    रेन वॉटर हार्वेस्टिंग नसलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांवर कारवाईचे आदेश

    गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आक्रमक. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई होणार. गोदापात्रातील अतिक्रमण आणि सांडपाणी रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना. गोदावरी प्रदूषित करणाऱ्यांवर पोलिस आणि मनपाची संयुक्त कारवाई होणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाचा अॅक्शन प्लॅन

  • 14 Jul 2026 09:00 AM (IST)

    एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घेणार भेटी

    एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगरनंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

  • 14 Jul 2026 08:50 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावलं

    उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावलं आहे. बुधवारी मुंबईत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. नाशिकमध्येही ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा असल्याने याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ही फक्त चर्चा आहे असं म्हणत, उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच हा दावा फेटाळून लावला आहे.

  • 14 Jul 2026 08:40 AM (IST)

    रायगड पालकमंत्री पदाबाबत आज महत्त्वाची बैठक

    रायगड पालकमंत्री पदाबाबत आज महत्त्वाची बैठक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्यात ही बैठक पार पडणार आहे. रखडलेल्या पालकमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकार स्थापन झाल्यापासून रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. रायगडमधील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यानंतर रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला होता.

  • 14 Jul 2026 08:30 AM (IST)

    सोमवारी रात्री पार पडली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

    सोमवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, ॲड. आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश तसेच आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर सलग 2 हजार 431 दिवस पूर्ण करत राज्याच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला आहे. यासह त्यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा 2 हजार 412 दिवसांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवल्यानं सर्व नेत्यांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं.

  • 14 Jul 2026 08:25 AM (IST)

    नाशिक – पावसाने बदलला त्र्यंबकेश्वर येथील साधू ग्रामचा आराखडा

    साधुग्रामासाठी निश्चित करण्यात आलेली जागा पाण्याखाली गेल्याने आणि संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने प्रशासनाने साधुग्रामाचं नियोजन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक आणि साधू-महंतांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उंच आणि पूरमुक्त पर्यायी जागेचा शोध पूर्ण झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान परिसरात सुमारे २५० एकर जागा साधुग्रामासाठी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक त्रंबकेश्वर येथे 2027 मध्ये भरणारा कुंभमेळा पावसाळ्यात असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

  • 14 Jul 2026 08:20 AM (IST)

    नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील तीन संशयीतांना शहरात प्रवेश बंदी

    नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील तीन संशयीतांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयाने जामीन देताना कठोर अटी घालत नाशिक शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील सहकाऱ्याच्या धार्मिक भावना दुखावून त्याचा छळ केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रकरणातील संशयित रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांनी आदेश दिला आहे.

  • 14 Jul 2026 08:15 AM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने म्हैस गटारात कोसळली

    मीरा-भाईंदर इंद्रलोक फेस 4 मध्ये फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने एक म्हैस गटारात कोसळल्याची धक्कादायक घटना रात्री बाराच्या सुमारास घडली असून, पालिकेचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गटारावरील झाडांचा पाला खाण्यासाठी गेलेली म्हैस आत पडल्याने तिच्या शिंगाला गंभीर दुखापत झाली. अग्निशमन दल आणि नवघर पोलिसांनी तब्बल ४ तास शर्थीचे प्रयत्न करत, जेसीपी आणि क्रेनच्या साहाय्याने म्हशीला सुरक्षित बाहेर काढलं. मुंबईतील मॅनहोल दुर्घटना ताज्या असतानाही मीरा भाईंदर महानगर पालिकेला जाग आली नसल्याने, आता आयुक्त संबंधित निष्काळजी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • 14 Jul 2026 08:12 AM (IST)

    मोशी दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेली भीषण दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला वेग आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात पालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

Published On - Jul 14,2026 8:10 AM

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ