AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत राहुल महाजनचा रोमान्स, भडकलेल्या डॉनने ओलांडल्या सर्व मर्यादा; उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठा खुलासा

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे रिलेशनशिप देखील होते. अशात गर्लफ्रेंडसोबत राहुल महाजनचा रोमान्स पाहून अंडरवर्ल्ड डॉन प्रचंड भडकलेला. यावर अनेक वर्षांनंतर वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी मोठा खुलासा केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत राहुल महाजनचा रोमान्स, भडकलेल्या डॉनने ओलांडल्या सर्व मर्यादा; उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठा खुलासा
Ujjwal Nikam
| Updated on: Jul 13, 2026 | 2:52 PM
Share

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मोनिका बेदी चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा तर सर्वदूर पसरलेल्या होत्या. एवढंच नाही तर, अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा झालेला. अशात अबू सलेम याने मोनिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर मोनिका हिच्या आयुष्यात मोठं संकट आलं. अबू सलेम याच्या प्रेमात मोनिका हिचं फक्त प्रोफेशनल आयुष्यच नाही तर, खासगी आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं. यावर आता वरिष्ठ उज्ज्वल निकम यांनी मोठा खुलासा केला आहे. अनेक वर्षांनंतर अबू सलेम आणि मोनिका बेदी यांच्या खासगी आयु्ष्याचं मोठं सत्य समोर आलं आहे.

अबू सलेम आणि मोनिका बेदी गुपचूप केलं लग्न?

2008 मध्ये मोनिका बेदी बिग बॉसमध्ये झळकली होती. शोमध्ये मोनिका बेदी आणि राहुल महाजन यांच्यातील जवळीक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती. शोमध्ये राहुल अनेकदा मोनिका हिला प्रोटेक्ट करताना देखील दिसला. असं देखील सांगितलं जातं की, मोनिका हिच्यासाठी राहुलच्या मनात असलेला सॉफ्ट कॉर्नर अबू सलेम याला बिलकूल आवडत नव्हता. आता याबद्दल उज्ज्वल निकम यांनी मोठी माहिती दिली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी केलेल्या दाव्यानुसार, राहुल आणि मोनिका यांना एकत्र पाहून अबू सलेम प्रचंड संतापायचा. तेव्हा बिग बॉसच्या घरात डॉनने एक सिक्रेट चिठ्ठी देखील पाठवलेली. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘मी एक अबू सलेम याला विचारलेलं, मोनिकासोबत खरंच लग्न केलं आहे का? यावर अबू सलेम म्हणालेला, ‘तुम्हाला आता का मी निकाहनामा दाखवू का? ‘मी त्याला म्हणालो, त्याची काहीही गरज नाही… पण मी हा प्रश्न विचारत आहे कारण मी ‘बिग बॉस’मध्ये मोनिकाला पाहिलं. त्याने मला लगेच विचारलं, “तुम्ही ‘बिग बॉस’मध्ये काय पाहिलं?” मी त्याला सांगितलं की, ‘बिग बॉस’मध्ये मोनिका दुसऱ्या एका मुलाच्या प्रेमात असल्याचं मला दिसलं…

‘अबू सलेमने पुन्हा मला विचारलं, खरंच पाहिलं…? यावर मी होकार दिला म्हणालो, ‘खरंच पाहिलं आहे. कोणी मला सांगितलं अबू सलेमची गर्लफ्रेंड बिग बॉसमध्ये आहे. त्यामुळे मला तिला बघायचं होतं… गर्लफ्रेंड कोण आहे आणि कशी दिसते?’, उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “न्यायालयात हे ऐकल्यावर अबू सालेम मला म्हणाला, ‘उद्या बिग बॉस बघा.’ दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बिद बॉस पाहिला, तेव्हा मोनिका त्या तरुणापासून अंतर राखून असल्याचं दिसलं…’, यावेळी निकम यांनी मात्र कोणाचं नाव घेतलं नाही.

अबू सलेम यांनी बिग बॉसमध्ये मोनिकासाठी काय मेसेज पाठवलेला?

उज्ज्वल निकम यांनी असा दावा केला की, ‘बिग बॉस’च्या घरात असताना अबू सालेमने मोनिकाला एक मेसेज पाठवून त्या पुरुषापासून दूर राहण्यास सांगितलं होतं; यावर उज्ज्वल निकम म्हणाले, ‘बिग बॉस’च्या सेटवर कोणत्याच प्रकारचे मेसेज पाठवता येत नाहीत… असं असताना देखील अबू सलेम याने बिग बॉसच्या घरात मोनिकासाठी मेसेज पाठवलेला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा