AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | परिस्थितीमुळे उर्फी घालते अतरंगी कपडे ? म्हणते, 7 लोकांमध्ये मी एकटीच कमावणारी…

उर्फी जावेद सध्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसत आहे. त्यावेळीच तिने तिच्या अतरंगी स्टाइल, कपड्यांमागचं कारण सांगितलं.

Uorfi Javed | परिस्थितीमुळे उर्फी घालते अतरंगी कपडे ? म्हणते, 7 लोकांमध्ये मी एकटीच कमावणारी...
Image Credit source: instagram
| Updated on: Aug 10, 2023 | 12:51 PM
Share

Uorfi Javed Revealed About Dressing Sense  : अजब कपडे, अतरंगी स्टाइल यामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती त्यामुळे ट्रोलही (trolling) होते. टेलीफोन वायर पासून ते पिझ्झा स्लाइस आणि च्युइंग गम पर्यंत अनेक गोष्टींनी बनलेले ड्रेस उर्फी घालत असते. यामुळे तिला सोशल मीडियावर बऱ्याच वेळेस ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. सध्या ती ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिसत असून, तिथेच तिन इतर स्पर्धकांसोबत बोलताना तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्सबद्दलही काही गोष्टी सांगितल्या.

आपण एक्स्ट्रा रिव्हिलिंग कपडे का घालतो याबद्दल बोलताना उर्फीने तिच्या स्ट्रगल फेजबद्दलही सांगितले. ती जेव्हा एका आठवड्यातच बिग बॉसमधून आऊट झाली तेव्हा आयुष्यचं संपलं, असं तिला वाटलं होतं. मी आयुष्यात आत्तापर्यंत काही केलेच नाही, असं मला वाटलं होतं. 7 लोकांमध्ये मी एकटीच कमावणारी होते, मी आता पुढे काय करू, माझं घर कसं चालेल, मला आता कोणीच काम देणार नाही, असं मला तेव्हा वाटलं होतं, अशी आठवण उर्फीने शेअर केली.

माझे घरचे खुश, तर मी खुश 

माझ्या कपड्यांमुळे मला अटेन्शन मिळतंय, हे माझ्या हळूहळू लक्षात आलं. त्यामुळे मी त्याचा फायदा घ्यायचा ठरवला असं उर्फीने सांगितलं. ‘ ज्या गोष्टीमुळे मला माझं घर (खर्च) चालवायला मदत मिळत आहे, दोन वेळचं जेवण मिळत आहे, माझे घरातले लोक, मी खुश आहे, ती (गोष्ट) योग्य आहे’असं मला वाटलं, असं उर्फीने नमूद केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यावर उर्फी नेहमीप्रमाणे ट्रोल नाही झाली, उलट तिचा प्रामाणिकपणा पाहून चाहते खूप खुश झाले, त्यांनी तिचं कौतुकही केलं.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

कपड्यांमुळे मिळत नाही घर!

यापूर्वीही अनेकवेळा उर्फी तिच्या स्ट्रगलबद्दल बोलली आहे. एका मुलाखतीत उर्फी म्हणाली होती की, इंटरनेट सेन्सेशन असूनही तिला तिच्यासाठी एक चांगलं घर शोधणंही कठीण झालं होतं. ती सध्या एका वन बीएचके फ्लॅटमध्ये कशीबशी रहात आहे. मुसलमान असूनही असे कपडे घातल्याने अनेक जण तिला घर देण्यास नकार देतात, असा खुलासाही उर्फीने केला होता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.