AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? रिता भारद्वाज केलं नाव, अभिनेत्रीने सांगितलं सत्य

तोकडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्यामुळे कायम चर्चेत असलेली उर्फी आता एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने तिचा धर्म बदलला असल्याचा दावा एका व्हिडीओत करण्यात आला आहे.

उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? रिता भारद्वाज केलं नाव, अभिनेत्रीने सांगितलं सत्य
उर्फी जावेदImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 10:13 AM
Share

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे, अतरंगी फॅशनमुळे नाही तर ओळख आणि धर्म बदलल्याच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओ असा दावा करण्यात आला आहे की उर्फीने तिचा धर्म बदलला आहे. मुस्लीम धर्म सोडून आता ती हिंदू ब्राह्मण झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर तर उर्फीने आता तिचं नाव बदलून रिता भारद्वाज असं ठेवल्याचंही त्यात म्हटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. हाच व्हिडीओ जेव्हा उर्फीपर्यंत पोहोचला, तेव्हा तिने त्यावर उत्तर देण्याचं ठरवलं.

उर्फी जावेदने या व्हायरल दाव्यांमागील सत्य सांगितलं आहे. मुस्लीम धर्म सोडून हिंदू ब्राह्मण बनल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर एका कंटेंट क्रिएटरने व्हिडीओ पोस्ट करत असा दावा केला की, उर्फीकडे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्याशिवाय दुसरं कोणतंच टॅलेंट नाही. त्यामुळे आता तिने तिचा धर्मसुद्धा बदलला आहे. या आरोपांवर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने लिहिलं, ‘कशा कशाप्रकारचे चोमू लोक पत्रकार बनतात. आंटी, थोडा होमवर्क करून घ्या. मी कधीच माझा धर्म किंवा नाव बदललेलं नाही. मी तसंही कोणत्या धर्माला मानत नाही. फक्त कपड्यांनीच नाही, तर बोलण्याच्या बाबतीतही मी बिनधास्त आहे. पण आज माझा मूड नाही.’ या पोस्टमध्ये उर्फीने तिच्याकडे काम नसल्याच्या दाव्यांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘एकदा गुगल करून पहा की मी आजवर किती शोज केले आहेत. वाईट बोलायचं असेल तर बिनधास्त बोला, पण खोट्या बातम्या पसरवू नका. तुझा मेकअप पाहून मलाच लाज वाटली. पण मी तुझ्याबद्दल असं काही करू शकत नाही, कारण कोणालाच काही फरक पडत नाही’, अशा शब्दांत तिने ट्रोलरला उत्तर दिलं आहे.

उर्फीने तिच्या पोस्टद्वारे हे स्पष्ट केलं आहे की तिने तिचं नाव किंवा धर्म बदललं नाही. त्यामुळे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काहीच तथ्य नाही. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा फेक न्यूजबद्दल नेटकऱ्यांमध्ये मतमतांतरे होत आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात