AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यासोबत वाद; उर्फी जावेद राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या महिला नेत्याची घेणार भेट

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीवरून चित्रा यांनी राज्य महिला आयोगालाही प्रश्न विचारले.

Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यासोबत वाद; उर्फी जावेद राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या महिला नेत्याची घेणार भेट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2023 | 11:26 AM
Share

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीवरून चित्रा यांनी राज्य महिला आयोगालाही प्रश्न विचारले. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली. या नोटिशीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. आज (शुक्रवारी) उर्फी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

तोकडे कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदवरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. “मला असे 56 नोटीस रोज येत असतात. त्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तरसुद्धा मी दिलेलं आहे. माझा आक्षेप आयोगावर नाही, तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

रुपाली चाकणकर यांचा पलटवार

“त्यांना पाठवलेली नोटीस त्यांनी नीट वाचली असती, तर हे प्रश्न त्यांना पडले नसते. त्याबद्दलचा अभ्यास थोडा कमी असल्याने हे प्रश्न विचारले गेले असतील. समाजामध्ये खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याविषयी ही नोटीस बजावली आहे”, असा पलटवार चाकणकर यांनी केला होता.

दुसरीकडे उर्फी तिच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रा वाघ यांच्याबद्दल काही पोस्ट लिहित आहे. तिचे हे ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली सास है’, ‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असे ट्विट्स उर्फी करत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच