Urfi Javed : काम न मिळाल्याने ती कडवट झाली आहे… उर्फीचा अमिषावर निशाणा
अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या आगामी 'गदर 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत एक विधान केले. मात्र त्यामुळे उर्फी जावेद प्रचंड भडकली आहे.

Urfi Javed Post : ‘गदर 2’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अमिषा पटेल (amisha patel) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजकाल अमिषा सतत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या (ott content) कंटेटबद्दल केलेल्या विधानाने गदारोळ माजला आहे. त्या बद्दल बोलताना तिने गे, लेस्बियन आणि होमोसेक्सुअल कंटेटबद्दलही तिचे मत मांडले.
अमिषा पटेलच्या म्हणण्यानुसार, आता संपूर्ण कुटुंबियांसोबत बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही. कारण त्यावरील कंटेट हा सर्वांसोबत पाहण्यासारखा नसतो, लहान मुलं असतील तर त्यांचे डोळे बंद करावे लागतात किंवा चाईल्ड स्क्रीन लॉक लावावे लागते. लोक स्वच्छ आणि चांगल्या सिनेमाची वाट पाहत आहेत. परंतु OTT वर या प्रकारचे काहीही दिसत नाही. या मुलाखतीत अमीषा एलजीबीटीक्यू कंटेंटबद्दलही बोलली. मात्र तिचं हे वक्तव्य सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला (Urfi Javed) अजिबात आवडलेले नाही. उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अमीषाची व्हिडिओ क्लिप पोस्ट करत तिच्यावर टीकाही केली आहे.

या व्हिडीओ क्लिपमध्ये अमिषा बरंच काही बोलताना दिसली आहे. OTT वर असभ्य भाषा वापरली जाते. तसेच या प्लॅटफॉर्मवर समलैंगिक आणि गे-लेस्बियन अशी दृश्ये असतात, जी मुलांना दाखवली जाऊ शकत नाहीत. हा व्हिडीओ पोस्ट करताना उर्फीने तिची नाराजी व्यक्त केली आहे. गे आणि लेस्बियन काय आहे ? असा सवाल तिने विचारला. ‘कहो ना प्यार है’ असं ती म्हणते, तेव्हा ते फक्त स्ट्रेट लोकांसाठी असते.
‘ एक पब्लिक फिगर असतानाही, कोणत्याही संवेदनशील विषयावर बोलताना त्याची माहिती न घेता बोलणाऱ्या लोकांचा मला खरंच राग येतो ! 25 वर्षांपासून काम न मिळाल्याने ती (अमिषा) अत्यंत कडवट झाली आहे.’ अशी टीका उर्फी जावेदने केली आहे. उर्फी नेहमीच आपले मुद्दे खुलेपणाने, स्पष्टपणे मांडत असते. अमिषा पटेलच्या या वक्तव्यावर अनेक यूजर्सही नाराज आहेत.
