AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा

Adinath Urmila Divorce : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. आदिनाथ याने फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली. दरम्यान, उर्मिलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पहिल्या प्रेमाने जखल दिल्यानंतर काय? यावर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर...? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या 'त्या' लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा
Urmila Kanetkar - Adinath kothare
| Updated on: Jul 16, 2026 | 3:31 PM
Share

Adinath Urmila Divorce : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी अखेर घटस्फोटाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. अखेर आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली आहे. ‘आम्ही परस्पर सहमतीने आमचा पती – पत्नी म्हणून प्रवास संपवत आहोत. पण मुलीसाठी कायम एकत्र असू…’ असं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आदिनाथ-उर्मिलाने घटस्फोट जाहीर केल्यानंतर अभिनेत्रीचा प्रेमाबाबतचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आळा आहे. एका शोमध्ये उर्मिलाला प्रेमाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. कार्यक्रमात उर्मिला हिच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकर देखील होती. प्रेम म्हणजे काय असं विचारताच उर्मिला म्हणाली, ‘प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास’.

त्यानंतर पुढे उर्मिला विचारण्यात आलं की, “जर त्याच प्रेमाने जखम दिली तर?” त्यावर काही सेकंद विचार करून उर्मिला म्हणते, “तर मग दुसरं प्रेम शोधायचं.” अभिनेत्रीचा शोमधील जुना व्हिडीओ आता तिच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतो आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला – आदिनाथ यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.  दरम्यान, घटस्फोटानंतर उर्मिल दुसरं लग्न करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचं नातं

एकत्र काम करत असताना उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने दोघांच्या नात्याचं रुपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये आदिनाथ आणि उर्मिला यांनी लग्न  केलं.

त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी गोंडस लेक जिजा हिचं जगात स्वागत केलं. पण तरी देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कारण एकेकाळी चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या आदिनाथ आणि उर्मिला यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण