Urmila Matondkar: एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, आता जगतेय असं जीवन
Urmila Matondkar: एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं उर्मिला मातोंडकर हिचं आयुष्य, अभिनेत्यांपेक्षा अधिक होतं अभिनेत्री मानधन, पण आता जगतेय असं जीवन..., उर्मिला आता बॉलिवूडमध्ये मध्ये सक्रिय नसली तरी असते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत

Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा उर्मिलाने फक्त बॉलिवूडवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. पण एका चुकीमुळे अभिनेत्रीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. 90 च्या दशकात उर्मीला अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती. शिवाय अभिनेत्रीचं मानधन देखल अभिनेत्यांपेक्षा अधिक होतं. आजही अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण सिनेमांमध्ये दिसत नाही.
उर्मिला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या अवघ्ये तिसऱ्या वर्षी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बालकलाकार म्हणून अभिनेत्री अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री लिड अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण यशाच्या उच्च शिखरावर पोहोल्यानंतर अभिनेत्रीला एक चूक महागात पडली.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना, उर्मिला ‘रंगिला’ सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेमात पडली. तेव्हा दिग्दर्शक विवाहित होते. असं असताना राम गोपाल वर्मा यांचा जीव उर्मिलावर जडला होता. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिलाच मुख्य अभिनेत्री म्हणून झळकू लागली.
उर्मिलाने राम गोपाल वर्मा व्यतिरिक्त इतर दिग्दर्शकांच्या सिनेमात काम करणंही बंद केलं. याचा अभिनेत्रीच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला. अनेक दिग्दर्शक उर्मिलावर नाराज झाले आणि नंतर तिला काम मिळणे बंद झालं. उर्मिलाला काम मिळणं बंद झालं आणि राम गोपल वर्मा यांच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील वाईट झाला.
View this post on Instagram
आज उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण अनेक कार्यक्रम किंवा कोणत्या सोहळ्यात अभिनेत्रीला स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.