Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरला झाली मुलगी? फोटो पाहून चर्चांना उधाण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 14, 2022 | 5:33 PM

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये मोहसिनच्या मांडीवर एक चिमुकली बसलेली पहायला मिळतेय. 'वॉव.. छोटी परी.. तू माझ्या हृदयावर राज्य करून वर्ष पूर्ण झालं आहे आणि हे वर्ष खूपच उत्साहपूर्ण होतं. छोटी परी आयराला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा', असं कॅप्शन मोहसिनने दिलंय.

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरला झाली मुलगी? फोटो पाहून चर्चांना उधाण
Urmila Matondkar, husband Mohsin Akhtar
Image Credit source: Instagram

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि तिचा पती मोहसिन अख्तर (Mohsin Akhtar) यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे मोहसिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो. या फोटोमध्ये मोहसिन एका छोट्या बाळासोबत पहायला मिळत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने तिला ‘छोटी परी’ असंही म्हटलंय. त्यामुळे त्यावर कमेंट करताना अनेकांनी उर्मिला आणि मोहसिन यांना शुभेच्छा देण्यात सुरुवात केली.

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये मोहसिनच्या मांडीवर एक चिमुकली बसलेली पहायला मिळतेय. ‘वॉव.. छोटी परी.. तू माझ्या हृदयावर राज्य करून वर्ष पूर्ण झालं आहे आणि हे वर्ष खूपच उत्साहपूर्ण होतं. छोटी परी आयराला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असं कॅप्शन मोहसिनने दिलंय.

या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. उर्मिला आणि मोहसिन यांची ती मुलगी असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं. अखेर मोहसिनने कॅप्शन एडिट करत पुढे लिहिलं, ‘माझी सुंदर पुतणी आयरा.’ त्यानंतर उर्मिलानेही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती मुलगी पुतणी असल्याचं स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

“आयरा ही माझ्या भावाची मुलगी आहे. मलासुद्धा अनेकांनी मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी फोटोचं कॅप्शन एडिट केलं”, असं मोहसिनने सांगितलं. उर्मिला आणि मोहसिन यांनी 3 मार्च 2016 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

उर्मिलाने रंगीला, जुदाई, सत्या, कौन, खुबसुरत, जंगल, प्यार तुने क्या किया, पिंजर, भूत, एक हसीना थी, मैने गांधी को नहीं मारा, बस एक पल, ब्लॅकमेल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI