AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओह… तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? फोटो पाहून नेटकरी पडले पेचात

उर्वशी रौतेलाने अखेर RP सोबतचा फोटो केला पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

ओह... तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? फोटो पाहून नेटकरी पडले पेचात
उर्वशी रौतेलाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2022 | 5:26 PM
Share

मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही काळापासून उर्वशीचं नाव टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंतशी (Rishabh Pant) जोडलं जात होतं. या दोघांमध्ये सोशल मीडियावर वादसुद्धा झाले. तेव्हापासून उर्वशी अनेकदा ऋषभला अप्रत्यक्षपणे टोमणे मारताना दिसते. उर्वशीने एका जुन्या मुलाखतीत RP या नावाचा उल्लेख केला होता. RP नावाचा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबला होता, असं ती म्हणाली होती. हा RP म्हणजेच ऋषभ पंत असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. मात्र आता अखेर उर्वशीने RP सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

उर्वशीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसणारा RP हा ऋषभ पंत नाही तर दाक्षिणात्य अभिनेता आहे. साऊथ अॅक्टर राम पोथीनेनीसोबत तिने हा खास फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे हाच उर्वशीच्या आयुष्यातील RP आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींनी या फोटोचं कनेक्शन भाऊबीजशीही जोडलंय.

उर्वशीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने अभिनेत्याला टॅग केलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘अच्छा.. तर हा आहे RP?’ असं एकाने लिहिलं. तर ‘ऋषभ भाऊ तू पाहतोय का’, अशा शब्दांत दुसऱ्याने मस्करी केली.

राम पोथीनेनी हा तेलुगू चित्रपटातील अभिनेता आहे. त्याने देवदासू या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. याशिवाय त्याने रेडी, वुन्नदी वोकटे जिंदगी, हॅलो गुरु प्रेमा कोसमे, कंदीरिगा यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?