AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! सारा-वरुणचा Coolie No 1 ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांचा Coolie No 1 हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

ठरलं! सारा-वरुणचा Coolie No 1 'या' दिवशी प्रदर्शित होणार
| Updated on: Nov 26, 2020 | 3:35 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळतील का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अजूनही निर्मात्यांचा ओढा डिजिटल (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याकडेच दिसत आहे. अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali-Khan) यांचा Coolie No 1 हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. वरुण आणि साराने सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे, सोबत चित्रपटाचे नवं पोस्टरदेखील शेअर केलं आहे. (Varun Dhawan Coolie no 1 release date comes out, will be released in decembe 2020)

डेव्हिड धवन दिग्दर्शित Coolie No 1 हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून साला अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील चित्रपटगृह बंद होती. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपाट वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कुली नंबर 1 हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर वन चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ आणि विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ नंतर अ‍मेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदीसह तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड या भाषांतील चित्रपट नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान अ‍मेझॉन प्राईम प्रदर्शित होणार आहेत.

या नऊ चित्रपटांपैकी अजय देवगणची निर्मिती असलेला आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘छलांग’ 13 नोव्हेंबर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. अक्षय कुमारची निर्मिती असलेला आणि भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेला ‘दुर्गावती’ 11 डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे.

गेल्या महिन्याभरात अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेले चित्रपट

हलाल लव्ह स्टोरी (मल्याळम) – 15 ऑक्टोबर भीमासेना नलामहाराजा (कन्नड) – 29 ऑक्टोबर सूरारी पोट्टूरु (तामिळ) – 30 ऑक्टोबर छलांग (हिंदी) – 13 नोव्हेंबर माने नंबर 13 (कन्नड) – 19 नोव्हेंबर मिडल क्लास मेलडीज् (तेलगू) – 20 नोव्हेंबर

अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणारे चित्रपट

दुर्गामती (हिंदी) – 11 डिसेंबर मारा (तामिळ) – 17 डिसेंबर कुली नंबर 1 (हिंदी) – 25 डिसेंबर

संबंधित बातम्या

Trailer Out | दुर्गामती चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरच्या जबरदस्त लूकमुळे चाहते उत्सुक!

Jallikattu | ‘जल्लीकट्टू’ची ऑस्कर शर्यतीत एंट्री, मल्याळम चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार!

(Varun Dhawan Coolie no 1 release date comes out, will be released in decembe 2020)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.