वरुण-साराच्या ‘कूली नं 1’ चं पहिलं पोस्टर

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा सुपरहिट चित्रपट 'कूली नंबर 1' च्या रिमेकची शूटिंग सुरु झाली आहे. गोविंदा आणि करिश्माचा हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:39 PM, 11 Aug 2019
वरुण-साराच्या 'कूली नं 1' चं पहिलं पोस्टर

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘कूली नंबर 1’ च्या रिमेकची शूटिंग सुरु झाली आहे. गोविंदा आणि करिश्माचा हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. जुन्या चित्रपटाचा रिमेक येत असल्याने अनेकजण हा नवा रिमेक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आज (11 ऑगस्ट) चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. डेव्हिड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची शूटिंग सुरु होताच पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण पोस्टरमध्ये या चित्रपटाबद्दलची काही माहिती दिलेली नाही. पोस्टरमध्ये हॅशटॅगसह म्हटलं आहे की, “अंदाज लावा कोण येत असेल”, हा पोस्टर वरुण धवनने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Get ready फ़र्स्ट लूक tomorrow #coolie #coolie #coolie

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

‘कूली नंबर 1’ चा रिमेक पूजा इंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. प्रोडक्शन हाऊसनुसार, हा चित्रपट 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये वरुण धवनचा चेहरा दाखवलेला नाही. पण कूलीची वेशभूषा दिसत आहे . शर्ट आणि सफेद पन्टसोबत हातात अनेक बॅग त्याने पकडलेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी वरुण धवनने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो शेविंग करताना दिसत होता. त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, मी कूली नंबर 1 साठी दाढी करत आहे. विशेष म्हणजे या जुन्या चित्रपटाचे दिग्गदर्शनही डेव्हिड धवन यांनी केले आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारखे कलाकार यामध्ये होते.