AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

61 व्या वर्षी आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल राखी यांचं रोखठोक मत; लग्नाचं सुख हे..

वयाची साठी ओलांडलेला आमिर खान येत्या जुलै महिन्यात गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करणार आहे. या लग्नाबाबत इंडस्ट्रीतून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनीसुद्धा त्यावर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

61 व्या वर्षी आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल राखी यांचं रोखठोक मत; लग्नाचं सुख हे..
राखी गुलजार, आमिर खान- गौरी स्प्रॅटImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2026 | 3:34 PM
Share

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आमिरच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 78 वर्षीय राखी यांनी सांगितलं की, इंडस्ट्रीत जे काही चाललं आहे, त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नाही, कारण त्या आता तितक्या सक्रिय नाहीत. आमिर खानसोबत त्यांनी कधीही काम केलं नाही. परंतु तो एक चांगला व्यक्ती आहे, असं त्या म्हणाल्या. आमिरने ज्याप्रकारे दोन वेळा लग्न मोडल्यानंतरही त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत नातं जसं सांभाळून ठेवलं आहे, त्यावरून त्याच्याविषयी बरंच काही समजतं, असं राखी पुढे म्हणाल्या.

वयाच्या 61 व्या वर्षी लग्न करण्यावरून आमिर खानवर बरीच टीकासुद्धा होत आहे. मात्र राखी यांनी स्पष्ट मत मांडलं की नात्यांची सोबत आणि आनंद या गोष्टी वयाने ठरवल्या जात नाहीत. ‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना त्या म्हणाल्या, “वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करण्यात समस्या काय आहे? रॉबर्ट डी नीरोने (हॉलिवूड अभिनेता) दोन वेळा लग्न केलं आणि आता पार्टनर टिफिनी शेनसोबत ते रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांना 2023 मध्ये एक मुलगीसुद्धा झाली. एका बाळाच्या जन्माच्या वेळी त्यांचं वय 80 पेक्षा जास्त होतं. वैवाहिक जीवनातील आनंद वयावर अवलंबून नसतो. जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा गुलजार 40 वर्षांचे होते.”

याआधी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनीसुद्धा आमिरच्या लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. “माझ्या मते प्रेम शोधण्यासाठी आणि संसार थाटण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे”, असं ते म्हणाले. विक्रम यांनी ‘गुलाम’ या चित्रपटात आमिरसोबत काम केलं होतं.

आमिरने त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याची घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि आमिर एकत्रच राहत आहेत. आता हे दोघं लग्न करत या नात्याला एक नवी ओळख देणार आहेत. गौरी ही मूळची बंगळुरूची असून तिला आधीच्या लग्नापासून सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. आमिर आणि गौरीच्या वयात जवळपास 14 वर्षांचं अंतर आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा