
Chhaava Box Office Collection Day 15: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाच्या कमाईचा वेग आता मंदावला असला तरी थांबलेला नाही. आजही सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. दोन आठवड्यात सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील मोठे विक्रम रचले आहे. आता 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने तिसऱ्या शुक्रवारी किती कोटी रुपयांचा गल्ला जमा केला जाणून घेऊ…
सांगायचं झालं तर, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. दिवसागणिक सिनेमाची चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अधिक रंगताना दिसत आहे. ‘छावा’ने आतापर्यंत आपल्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. आता हा सिनेमा रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला असून यासोबतच या सिनेमाने आणखी एक मोठा विक्रम रचला आहे. ‘छावा’ने तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 15 व्या दिवशी 400 कोटींचा आकडा पार केला आहे.
‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 219.25 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 180.25 कोटींची कमाई केली. आता सिनेमाच्या 15 व्या दिवसाचे म्हणजे तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
रिपोर्टनुसार, सिनेमाने 15 व्या दिवशी 13 कोटींचा गल्ला जमा केला आहे. म्हणजे सिनेमाने 15 दिवसांमध्ये 412.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने रिलीजच्या 15 दिवसांत 412 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. ‘छावा’ हा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा 2025 मधील पहिला सिनेमा ठरला आहे. 15 व्या दिवशी 13 कोटींच्या कलेक्शनसह अनेक मोठ्या सिनेमांना ‘छावा’ने मागे टाकले आहे.
‘पुष्पा 2’ सिनेमाने 15 व्या दिवशी 14 कोटींची कमाई केली होती. ‘छावा’ सिनेमाने 15 व्या दिवशी 13 कोटींची कमाई केली आहे. तर ‘बाहुबली’ सिनेमाने 15 व्या दिवशी 10.05 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. ‘छावा’ सिनेमाने अभिनेता किंग खान म्हणजे शाहरुख खान याच्या सिनेमांना देखील मागे टाकलं आहे.