AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ चं रौद्र रुप समोर, रचतोय नवे विक्रम, सर्वत्र सिनेमाचा बोलबाला

Vicky kaushal Starrer Chhaava: सलग सातव्या दिवशी 'छावा'चा रौद्र रुप मिळतोय पाहायला, सिनेमा रचतोय नवे विक्रम, तर विकी कौशलचं सर्वच स्तरातून होत आहे कौतुक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा...

'छावा' चं रौद्र रुप समोर, रचतोय नवे विक्रम, सर्वत्र सिनेमाचा बोलबाला
| Updated on: Feb 21, 2025 | 1:24 PM
Share

Vicky kaushal Starrer Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकीला पहिल्यानंतर अभिनेत्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.

दिग्दर्शत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाचं विश्लेषक आणि प्रेक्षकांकडून सतत कौतुक होत आहे. हा एक बायोपिक सिनेमा आहे ज्याची कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या बलिदानावर आधारित आहे.

सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

14 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने 33 कोटींची कमाई केली. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन सात दिवस झाले असून, सिनेमाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सिनेमा पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे.

बुलेट ट्रेनच्या स्पीडने ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारताना दिसत आहे. जगभरात सिनेमाने 270 कोटींचा आकडा ओलांडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 31कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 37 कोटी रुपयांचा कमाई केली. तिसऱ्या सिनेमाने 48.5 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली… तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. चौथ्या दिवशी सिनेमाने 24 कोटी रुपये, तर पाचव्या दिवशी 25.25 रुपयांचा गल्ला जमा केला.

सहाव्या दिवशी सिनेमाने 32 कोटी रुपयांची कमाई केली. सांगायचं झालं तर, शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. सलग सातव्या दिवशी देखील सिनेमाने 22 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे सिनेमाने सात दिवसात 219.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच बोलबाला दिसत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी