विशाल ददलानीचा अपघात, कशी आहे गायकाची प्रकृती? मोठी अपडेट समोर

Vishal Dadlani Health Update: प्रसिद्ध गायक विशाल ददलानीचा अपघात... अपघातानंतर गायकाचा मोठा निर्णय, कशी आहे प्रकृती? विशालच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर..., अपघातानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता...

विशाल ददलानीचा अपघात, कशी आहे गायकाची प्रकृती?  मोठी अपडेट समोर
| Updated on: Feb 14, 2025 | 8:41 AM

Vishal Dadlani Health Update: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक विशाल ददलानी याचा अपघात झाला आहे. अपघातामुळे गायकाने पुण्यात होणारा कॉन्सर्ट देखील रद्द केला आहे. अपघातानंतर गायकावर सध्या उपचार सुरु आहेत. विशालच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण त्याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. स्वतः विशाल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिल्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.

इन्स्टाग्राम स्टोरीवर विशाल ददलानी याने एका पोस्ट शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे. ‘मझा लहान अपघात झाला आहे. मी लवकरच परत येईल… मी तुम्हाला सर्वांना अपडेट देत राहिल…’ असं गायक म्हणाला. पण विशालचा अपघात कधी, कुठे आणि कसा झाला याबद्दल काही कळू शकलेलं नाही. शिवाय अपघातामुळे रद्द करण्यात आलेल्या कार्यक्रमांनी पुढची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

2 मार्च रोजी होणार होता कॉन्सर्ट…

2 मार्च रोजी विशाल याच्यासोबत गायक विशाल देखील परफॉर्म करणार होता. पण अपघातामुळे कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. आता शोच्या व्यवस्थापकांनी देखील याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘तुम्हाला कळविण्यास खंत वाटत आहे की, विशाल आणि शेखर या प्रसिद्ध जोडीदाराच्या मोस्ट अवेटेड अर्बन शो म्युझिक कॉन्सर्टची 2 मार्च 2025 रोजी होणारी तारीख विशाल ददलानीच्या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.’

 

 

रिफंड होणार पैसे…

एवढंच नाही तर, प्रेक्षकांच्या तिकीटांबद्दल देखील व्यवस्थापकांनी माहिती दिली आहे. ‘ज्यांनी शोची तिकीटं खरेदी केली होती, त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील… शिवाय शोच्या पुढील तारखेची देखील लवकरच घोषणा करण्यात येईल…’ अशी माहिती दिली आहे.