AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET च्या वादावर बोलणं भोवलं, ‘इंडियन आयडॉल’नं दाखवला बाहेरचा रस्ता? गायक म्हणाला..

प्रसिद्ध गायक विशाल ददलानीला नीट पेपरफुटीच्या वादावर बोलणं महागात पडल्याची चर्चा सुरू आहे. त्याला इंडियन आयडॉल 16 च्या परीक्षकपदावरून काढून टाकल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता खुद्द विशालनेच प्रतिक्रिया दिली आहे.

NEET च्या वादावर बोलणं भोवलं, 'इंडियन आयडॉल'नं दाखवला बाहेरचा रस्ता? गायक म्हणाला..
विशाल ददलानीImage Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 2:47 PM
Share

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं बेधडकपणे मांडत असतो. विशाल गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडॉल 16’ या शोमध्ये परीक्षक म्हणून झळकत आहे. नुकताच त्याने देशातील नीट पेपरफुटीच्या वादावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. नीट पेपरफुटीच्या वादावर आणि देशाच्या दयनीय स्थितीवर नाराजी व्यक्त करत त्याने म्हटलं होतं की, “कृपया अशा अडाणी मूर्खांना सत्तेवर बसवू नका.” यानंतर त्याला ‘इंडियन आयडॉल 16’च्या परीक्षकपदावरून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं. आता या चर्चांवर खुद्द विशालनेच प्रतिक्रिया दिली आहे.

विशालने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्याने स्पष्ट केलं की या वृत्तांमध्ये काहीच तथ्य नाही. सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवांची खिल्ली उडवत विशालने लिहिलं, “लक्षात ठेवा, ऑनलाइन दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. खूप मोठ्या प्रमाणात हेराफेरी सुरू आहे. जे योग्य आहे, त्यासाठी लढत राहा आणि जे बोलायला हवं ते बोलत राहा.” या व्हिडीओमध्ये विशाल गमतीने इंडियन आयडॉलच्या सेटवर रडण्याचं नाटक करतानाही दिसला. त्यानंतर तो खळखळून हसतो आणि म्हणतो, “मी इथेच आहे.” म्हणजेच इंडियन आयडॉलमधून त्याला काढून टाकलेलं नाही. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

विशाल ददलानीचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

नीट पेपरफुटीप्रकरणी काय म्हणालेला विशाल?

“ज्या विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फटका बसला आहे, त्रास सहन करावा लागला आहे, ज्यांचा वेळ वाया गेला आहे, ज्यांचं कदाचित वर्ष वाया जाईल, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी हा व्हिडीओ पोस्ट करतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा सरकारी यंत्रणा जबाबदारी घेत नाही, तेव्हा ते आणखी चुकीचं ठरतं. जे मंत्री म्हणत आहेत की, यात काय मोठी गोष्ट आहे, आम्ही राजीनामा देणार, तेव्हा तर परिस्थिती अधिकच वाईट आहे. हे लज्जास्पद आहे. दुर्दैवाने आपण एका अशा काळात जगत आहोत, जिथे शिक्षणाचं काहीच महत्त्व नाही. कारण जे सत्तेत आहेत ते सुशिक्षित नाहीत. ही गोष्ट भारताला उद्ध्वस्त करू शकते. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण हेच सत्य आहे. शक्य झालं तर किमान सुशिक्षित लोकांना निवडून द्या. चांगल्या लोकांना, सुशिक्षित लोकांना मत द्या. जात, धर्म, वर्ण या सर्वांमधून बाहेर पडून जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर, या देशाचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला चांगल्या लोकांना निवडून द्यावंच लागेल. अशा अडाणी मूर्खांना सत्तेवर आणू नका, जरी ते तुमच्या कुटुंबातील का असेना. अशा लोकांना मत देऊ नका”, असं तो म्हणाला होता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल