AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी

200 कोटींचं बजेट, तीन मोठे सुपरस्टार असून देखील 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ठरला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट. जगभरात कमवले फक्त 44 कोटी.

200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 27, 2026 | 10:10 AM
Share

Bollywood Movies : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या मोठे बजेट, भव्य सेट्स आणि सुपरस्टार कलाकारांची फौज असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात असा समज झाला आहे. पण हा समज या चित्रपटाने दूर केला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘कन्नप्पा’ बाबतीतही असंच काहीसं घडलं. तब्बल 200 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाकडून साऊथ आणि बॉलिवूडमध्ये इतिहास घडेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने सर्वांनाच धक्का दिला.

‘कन्नप्पा’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत विष्णु मंचू दिसले, मात्र खरी चर्चा होती ती दमदार कॅमिओ भूमिकांची. पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास, मल्याळम चित्रपटसृष्टीतील महानायक मोहनलाल आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हे तिन्ही दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात झळकणार असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. पडद्यावर हे तिन्ही सुपरस्टार एकत्र दिसल्यावर थिएटरमध्ये जल्लोष होईल अशी अपेक्षा बांधली होती. पण दुर्दैवाने चित्रपटाची कथा आणि जुना मांडणीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

यामुळे फ्लॉप झाला चित्रपट?

चित्रपट अपयशी ठरण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची स्क्रिप्ट आणि त्याची मांडणी. 200 कोटी रुपये खर्च करूनही चित्रपटातील VFX आणि स्पेशल इफेक्ट्स प्रेक्षकांना भारावून टाकू शकले नाहीत. आजचा प्रेक्षक ‘बाहुबली’, ‘कांतारा’ आणि अशा भव्य सिनेमांचा अनुभव घेऊन आला आहे. त्यामुळे सादरीकरणात जर किंचितही चूक झाली तर प्रेक्षक चित्रपट नाकारायला वेळ लावत नाहीत हे ‘कन्नप्पा’च्या बाबतीत स्पष्टपणे दिसून आलं.

चित्रपट रिलीज होताच पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कमाईत घसरण पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर प्रमोशन, सुपरस्टार्सची उपस्थिती असूनही अनेक ठिकाणी सिनेमागृहांमध्ये शुकशुकाट होता. 200 कोटींचा खर्च वसूल करण्याचं स्वप्न पाहणारा ‘कन्नप्पा’ आपल्या बजेटच्या निम्म्या रकमेपर्यंतही पोहोचू शकला नाही.

क्रिटिक्सकडूनही चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या ज्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर झाला. विष्णु मंचू यांच्या ‘कन्नप्पा’ ने जगभरात फक्त 44 कोटी रुपयांची कमाई केली. ‘कन्नप्पा’च्या अपयशातून पुन्हा एकदा हेच स्पष्ट झालं आहे की, केवळ मोठे बजेट आणि सुपरस्टार असून चालत नाही. मजबूत कथा, प्रभावी मांडणी आणि दर्जेदार सादरीकरणाशिवाय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचणं आजच्या काळात अशक्य आहे.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.