सिक्स पॅक अॅब्स असलेला दक्षिणेचा पहिला स्टार, अल्लू अर्जुनच्या फिटनेसचे रहस्य काय?
tv9 ceo md barun das, waves 2025, south superstar allu arjun, south superstar allu arjun fitness, allu arjun fitness, allu arjun on fitness, WAVES 2025

‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज 2025) मध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘टीव्ही9’ चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी संवाद साधला. यावेळी अल्लू अर्जुनने चाहत्यांसमोर त्याच्या फिटनेसचं रहस्य देखील उलगडलं. सांगायचं झालं तर, चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ ची (वेव्हज 2025) सुरुवात गुरुवार, 1 मे रोजी मुंबईत झाली. समिटच्या पहिल्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी देशातील आघाडीच्या सेलिब्रिटींना संबोधित केलं आणि त्यांच्याशी सिनेविश्वाबद्दल विस्तृत चर्चा केली.
तर, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने यावेळी ‘टीव्ही 9’ चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी चर्चा केली. अल्लू अर्जुनने बरुण दास यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान, त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अल्लू अर्जुन हा पहिला दक्षिण अभिनेता आहे ज्याने त्याच्या सिक्स पॅक अॅब्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ‘पुष्पा’ ने चाहत्यांसमोर तिच्या फिटनेसचं रहस्य उलगडलं आहे.
काय आहे अल्लू अर्जुनच्या फिटनेसचं रहस्य?
अल्लू अर्जुनला त्याच्या फिटनेसचे रहस्य विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, ही फक्त मानसिकतेची गोष्ट आहे. खरं तर फिटनेस प्रत्येक अभिनेत्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः भारतीय अभिनेत्यासाठी. कारण सिनेमांमध्ये अभिनेत्यांना डान्स करायचा असतो, फाईट करायची असते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शारीरिकदृष्ट्या तयार असलं पाहिजं. मी शूटवर असलो किंवा नसलो तरी, मी व्यायाम करतो. शारीरिकदृष्ट्या फिट फक्त अभिनेत्यांनी नाही तर प्रत्येकाने असलं पाहिजे.’
पहिल्यांदा कोणत्या सिनेात अल्लू अर्जुन याने दाखवले सिक्त पॅक
स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगोत्री’ सिनेमातून पदार्पण केलं. 2007 मध्ये अल्लू पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर सिक्स पॅक अॅब्ससह दिसला होता. त्यानंतर त्याचा ‘देसमुदुरु’ हा सिनेमा प्रदर्शित झाला जो पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता.
अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा
‘पुष्पा 2’ च्या प्रचंड यशानंतर, अल्लू अर्जुन आता 800 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या अॅटली कुमारच्या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं अधिकृत शीर्षक अद्याप जाहीर झालेलं नाही. पण सध्या अल्लूचा 22 वा आणि अॅटलीचा सहावा सिनेमा म्हणून त्याला AA22xA6 असं नाव दिलं आहे.
