ऐश्वर्याचं काय? अभिषेकबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ डिलिट करताच नेटकऱ्यांचा अभिनेत्रीला सवाल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरसोबतच्या विवाहबाह्य संबंधाच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. या चर्चांदरम्यान सिमी गरेवाल यांनी अभिषेकचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्याच्यासाठी पोस्ट लिहिली होती.

ऐश्वर्याचं काय? अभिषेकबद्दलचा 'तो' व्हिडीओ डिलिट करताच नेटकऱ्यांचा अभिनेत्रीला सवाल
Abhishek Bachchan and aishwarya rai
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 3:33 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री सिमी गरेवालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. अभिषेकने जेव्हा त्यांच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी अभिषेकची बाजू घेतली. “माझ्या मते जे लोक अभिषेकला जवळून ओळखतात ते माझ्या या मताशी सहमत असतील की तो बॉलिवूडमधील सर्वांत चांगला माणूस आहे. त्याच्यात चांगली मूल्ये आणि जन्मजात शालीनता आहे,” असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यामध्ये अभिषेक नात्यातील प्रामाणिकतेबद्दल बोलताना दिसला. मात्र नेटकऱ्यांनी यावरून जेव्हा नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, तेव्हा सिमी गरेवाल यांनी तो डिलिट केला. आता ऐश्वर्याच्या चाहत्यांनी सिमी यांना सवाल केला आहे.

सिमी गरेवाल यांच्या मुलाखतीत अभिषेक काय म्हणाला?

“मला तुम्ही जुन्या विचारांचा म्हटलंत तरी चालेल पण उथळ स्वभावाच्या लोकांविरोधात माझ्या मनात काहीच नकारात्मक नाही. ज्या लोकांना मजा करायला आवडते, त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. जर एखाद्या नात्यात दोघांची हीच इच्छा असेल तर बिनधास्तपणे जगा. सर्व प्रकारे जगण्याचा आनंद घ्या. पण जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं असेल, मग ते कोणत्याही बाबतीत असो.. त्याच्याशी तुम्ही बांधिल राहा. अन्यथा तुम्ही वचन देऊ नका. माझं हे वैयक्तिक मत आहे की एक पुरुष म्हणून तुम्ही एका महिलेला वचन देत असाल, मग जरी तुम्ही तिचा बॉयफ्रेंड असलात तरी तिच्याशी प्रामाणिक राहा. कारण जर ती तुमच्याशी प्रामाणिक राहिली नाही, तर ते तुम्हालाही आवडणार नाही. पुरुषांवर आधीच प्रामाणिक नसल्याचा आरोप केला जातो. मला ही गोष्ट कधीच समजली नाही आणि त्याच्याशी मी सहमत नाही. मला त्या गोष्टीची चिड येते”, असं अभिषेक या व्हिडीओत म्हणाला.

Simi Garewal posts an old interview clip with Abhishek where he says he will never cheat; calls him the nicest guy, and deletes the post after facing wrath of public byu/Xixiq inBollyBlindsNGossip

हे सुद्धा वाचा

निम्रत कौरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप होत असतानाच सिमी गरेवाल यांनी अभिषेकचा बचाव करण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. मात्र त्याचसोबत ऐश्वर्यासाठी काहीच का लिहिलं नाही, असा सवाल काहींनी केला आहे. ‘अत्यंत वादग्रस्त वेळी हा व्हिडीओ शेअर केला आहे, हे चांगलं नाही’ असं एकाने म्हटलं. तर ‘तुम्ही अभिषेकचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहात, पण ऐश्वर्याचं काय? ती चांगली नाही का? बच्चन कुटुंबीयांनी तिला उद्ध्वस्त केलंय’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. टीकेनंतर सिमी गरेवाल यांनी त्यांची ही पोस्ट डिलिट केली. मात्र त्याचा स्क्रीनशॉट रेडिटवर व्हायरल होत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.