माधुरी दीक्षित अन् पती डॉ. श्रीराम नेने यांच्या वयात नेमकं किती अंतर? दोघांपैकी कोणाची नेटवर्थ जास्त
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी माधुरीने एक खास पोस्टही शेअर केली होती. पण तुम्हाला माहितीये का की माधुरी आणि नेने यांच्या वयात किती वर्षांचे अंतर आहे? आणि त्यांच्यापैकी नेटवर्थ कोणाची जास्त आहे हे जाणून घेऊयात

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांची लग्नाचा 26 वा लग्नाचा वाढदिवस झाला. माधुरीने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नाची 26 वर्षे साजरी केली आहेत. या खास प्रसंगाचे औचित्य साधून माधुरीने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक सुंदर क्षण झाला आहे. ज्यामध्ये ते एकत्र सुट्टी घालवत आणि हसत असल्याचं दिसत आहे. माधुरीने या पोस्टसोबत एक गोड कॅप्शन देखील लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.
17 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांच्या लग्नानंतर माधुरी अमेरिकेत राहायला गेली
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते. डॉ. नेनेंना कदाचित कल्पनाही नव्हती की ते एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीशी लग्न करतील. 17 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांच्या लग्नानंतर माधुरी अमेरिकेत राहायला गेली. जवळजवळ एक दशक अमेरिकेत प्रसिद्धीपासून दूर राहिल्यानंतर, माधुरी भारतात परतली आणि तिची कारकीर्द पुन्हा सुरू केली. “आजा नचले” या चित्रपटातून तिने पुनरागमन केले, जरी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने चित्रपट आणि टेलिव्हिजन दोन्हीमध्ये काम केले.
माधुरी दीक्षितने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे
माधुरी दीक्षितने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ती तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण करून देते. व्हिडिओमध्ये त्यांचे एकत्र सुट्टी घालवताना आणि एकत्र आनंदी दिसत असलेले फोटो आहेत. माधुरीने व्हिडिओला एक छोटी पण गोड कॅप्शन दिली आहे, “क्षणांपासून आठवणींपर्यंत, हातात हात घालून आयुष्यात चालताना 26 वर्षे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” असं म्हणत तिने नवऱ्याला शुभेच्छा दिला आहे.
View this post on Instagram
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची पहिली भेट
माधुरी आणि श्रीराम नेने यांची ओळख तिच्या भावाने करून दिली होती. सुरुवातीला माधुरी श्रीराम यांना तयार नव्हती, पण नंतर भावाने समजावलं आणि तयार झाली. श्रीराम यांच्या साधेपणाने पहिल्याच भेटीत माधुरीचे मन जिंकले. दोघांनी 17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेत एका साध्या समारंभात लग्न केले.
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांच्या वयातील अंतर
श्रीराम नेनेंचा जन्म 11 फेब्रुवारी 1966 रोजी झाला, तर माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी झाला होता. माधुरी दीक्षित पतीपेक्षा 16 महिन्यांनी लहान आहे. दोघांचं लग्न 17 ऑक्टोबर 1999 रोजी झालं. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती
माधुरी दीक्षित 90 च्या दशकापासून बॉलुवूडमध्ये आहे. रिपोर्टनुसार माधुरीची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये आहे. तर डॉ. श्रीराम नेनेंची एकूण संपत्ती 100 ते 150 कोटी रुपये असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय.
