AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय? सोशल मीडियावर खमंग चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय? सोशल मीडियावर खमंग चर्चा!
| Updated on: Feb 21, 2021 | 2:32 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. 2016 मध्ये करीना पहिल्यांदा आई झाली होती. (What is the name of Kareena Kapoor’s second baby? Discussion on social media)

यावेळी सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या नावावरुन करीना आणि सैफ चांगलेच ट्रोलही झाले होते. आता सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तैमूरच्या भावाचे नाव काय…सोशल मीडियावर अनेकांनी बाळाचं नाव सुचवत करीना-सैफवर निशाणा साधलाय.

आता पुन्हा एकदा मीडियात सैफच्या दुसऱ्या मुलाच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काहींनी तर ‘मुबारक हो औरंगजेब आया है’ असं म्हंटलं आहे. तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब आला अशा कमेंट करत निशाणा साधलाय. तर काहींनी महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशी नावं सूचवत सैफ आणि करीनाला पुन्हा ट्रोल केलंय.

यापूर्वी 2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करीनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

संबंधित बातम्या : 

गोड बातमी: करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस, इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज

(What is the name of Kareena Kapoor’s second baby? Discussion on social media)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.