अमिताभ बच्चन यांची जात आणि पाकिस्तानशी असलेलं नातं माहिती आहे का?

कोणाला नाही माहिती अमिताभ बच्चन यांचं खरं नाव, काय आहे त्यांची जात आणि थेट कनेक्शन पाकिस्तानसोबत..., बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणमुळे असतं चर्चेत...

अमिताभ बच्चन यांची जात आणि पाकिस्तानशी असलेलं नातं माहिती आहे का?
फाईल फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 12:45 PM

महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत बिग बी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक जण बिग बी या नावाने ओळखतो. पण त्यांचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे. अमिताभ बच्चन यांचं खरं नाव इंकलाब श्रीवास्तव असं होतं. आई – वडिलांनी बिग बींचं नाव ठेवलं होतं. पण त्यानंतर वडील हरिवंश राय बच्चन यांनी सुमित्रानंद यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर बिग बीच्या नावात बदल केले. तेव्हा इंकलाब श्रीवास्तव चाहत्यांचे आवडते अमिताभ बच्चन झाले.

अमिताभ बच्चन हिंदू चित्रगुप्तवंशी कायस्थ आहे. त्यांनी KBC मध्ये स्वतःच्या जातीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. बिग बी म्हणाले होते, ‘माझे वडील उत्तर प्रदेश येथील होते आणि शीख कुटुंबातील होते. मी अर्धा सरदार आहे.’ सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांच्या आईचा जन्म पाकिस्तान येथील झाला होता. त्यांचं नाव तेजवंत कौर संधू असं होतं.

अमिताभ बच्चन यांचे वडील कायस्थ होते, पण बच्चन लावल्यामुळे त्यांची जातीबद्दल कोणाला काही कळलं नाही. बिग बी यांनी आडनाव बदल्याचं कारण देखील सांगितलं. ‘शाळेत एडमिशन होत असताना बिग बी यांचं नाव बदण्यात आलं. कारण त्यांच्या जातीबद्दल कोणााल काहीही माहिती पडू नये…’ असं देखील बिग बी म्हणाले होतं.

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचं लग्न हिंदू पंजाबी घरात झालं. तर अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिंदू तुलुवा बंट कुटुंबातील आहे. अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त वर्ष झाली आहे. पण आजही दोघे अनेक ठिकाणी एकत्र आणि आनंदी दिसतात.

लग्नाआधी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर जया बच्चन फार कमी काम करतील. ठराविक प्रोजेक्टमध्ये आणि चांगल्या लोकांसोबत जया बच्चन काम करतील… अशी अट बिग बी यांनी ठेवली होती आणि जया बच्चन यांनी ती मान्य देखील केली.

लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण जया बच्चन मात्र घर आणि मुलांमध्ये व्यस्त झाल्या. आज लग्नाच्या जवळपास 50 वर्षांनंतर देखील जया बच्चन आणि अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. जया बच्चन नुकताच ‘राजा रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटील आल्या होत्या.