AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात हिंदू दिग्दर्शक जेव्हा म्हणाला, ‘ऐ मोटी, I Love You यार, मुझसे…’ पुढे जे झालं ते…

एक काळ सिनेविश्व गाजवलेल्या अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज त्यांच्या खासगी आणि प्रेम प्रकरणांबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात, आता देखील अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिला एका हिंदू दिग्दर्शकाने अनेकदा लग्नासाठी विचारलं...

मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात हिंदू दिग्दर्शक जेव्हा म्हणाला, 'ऐ मोटी, I Love You यार, मुझसे...' पुढे जे झालं ते...
| Updated on: Jul 04, 2026 | 1:41 PM
Share

झगमत्या विश्वातील अनेक अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर आहेत. पण खासगी आयु्ष्यामुळे कामय चर्चेत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुमताज आहेत. 1970 मध्ये मुमताज हिंदी सिनेविश्वाच्या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘खिलौना’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्याकाळात मुमताज फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आलेल्या. कारण त्यांच्या नावाची चर्चा रंगलेली प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासोबत.

रिपोर्टनुसार, यश चोप्रा यांनी अनेकदा मुमताज यांनी लग्नासाठी विचारलं. पण मुमताज यांनी कधीच यश चोप्रा यांच्या प्रेमाचा आणि भावनांचा स्वीकार केलं नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, यश यांचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्यांच्यावर कधीच प्रेम नव्हतं. एवढंच नाही तर, यश चोप्रा यांच्या निधनानंतर मुमताज यांनी यश चोप्रा यांच्याबद्दल मोठा खुलासा केलेला. एक मुलाखतीत मुमताज यांना विचारण्यात आलं की, ‘यश चोप्रा यांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं?’

यावर मुमताज म्हणाल्या, ‘त्यांनी मला लग्नासाठी एकदा नाही तर 1000 वेळा विचारलं असेल. पण मी त्यांच्यावर कधी प्रेम केलंच नाही. प्रेम नसेल तर लग्न तरी कसं करणार. ते मला कायम म्हणायचे ‘ऐ मोटी आय लव्ह यू यार… मुझसे शादी कर ले…’ मी त्यांच्यावर प्रेम केलं पण फक्त दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून. त्यापेक्षा जास्त काहीही नाही. मी लंडनमध्ये असताना कायम त्यांचा फोन यायचा ते म्हणायचे माझा नवीन सिनेमा प्रदर्शित झाला आहे नक्की बघ… ते कायम मला सिनेमा पाहायला सांगायचे… आता ते या जगात नाही याचं फार दुःख होत…’ असं देखील मुमताज मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

मुमताज यांचं लग्न आणि मुलं

मुमताज यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं. पण इंडस्ट्रीतील पुरुषासोबत लग्न केलं नाही. मुमताज यांनी 1974 मध्ये मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं. मुमताज यांना दोन मुली देखील आहे. सांगायचं झालं तर, मुमताज गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी आईच्या भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला.

Follow Us
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!
Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...