AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनावट कागदपत्रांद्वारे व्हिसा, बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न; ‘या’ इराणी अभिनेत्रीला थेट भारतातून केलंय हद्दपार

नेगार खान ही इराणी आणि नॉर्वेयन अभिनेत्री आहे. भारतात ग्लॅमर विश्वात आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी तिने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. यामुळे तिला भारतातून हद्दपार केलं होतं.

बनावट कागदपत्रांद्वारे व्हिसा, बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न; 'या' इराणी अभिनेत्रीला थेट भारतातून केलंय हद्दपार
इराणी अभिनेत्री नेगार खानImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 1:21 PM
Share

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणशी संबंधित प्रत्येक वृत्त सध्या चर्चेत आहे. अशातच इराणी अभिनेत्री नेगार खानचंही नाव प्रकाशझोतात आलं आहे. एकेकाळी ग्लॅमर आणि वादांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या नेगारचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावं असंच आहे. तिला भारतातून हद्दपार करून तिच्या देशात परत पाठवण्यात आलं होतं. नेगार खान हे नाव जरी तुम्हाला माहीत नसलं तरी ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ याचं रिमिक्स गाणं तुम्हाला नक्कीच माहीत असेल. याच रिमिक्स गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकली होती. या व्हिडीओतील बोल्ड अंदाजामुळे नेगार तुफान चर्चेत आली होती. ग्लॅमर विश्वातील तिची एण्ट्री या कारणामुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी होती.

2005 मध्ये नेगार खानवर मोठे आरोप लावण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा मिळवण्याचा आरोप झाल्यामुळे नेगार त्यावेळी वादाच्या भोवऱ्याच सापडली होती. ती टूरिस्ट व्हिसावर भारतात काम करत होती. त्यानंतर तिला भारतातून हद्दपार करत थेट नॉर्वेला पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी नेगार आणि तिचा पूर्व पती साहिल खान यांनी लग्नाचा आधार घेतला होता. लग्नामुळे नेगार भारतीय नागरिकत्वासाठी पात्र असल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु नंतर कायदेशीर गुंतागुंत इतकी वाढली की तिला थेट देशच सोडावा लागला होता.

भारत सोडल्यानंतर नेगारने हार मानली नाही, तिने नॉर्वेमध्ये पुन्हा तिचं करिअर सुरू केलं. तिथल्या ‘पॅराडाइज हॉटेल’ या शोमध्ये तिने भाग घेतला होता. परंतु तिथेही काही वाद निर्माण झाले. नेगारवर प्लास्टिक सर्जरी केल्याचा आरोप होता. परंतु हे सर्व आरोप तिने फेटाळून लावले होते. मी कोणतीही सर्जरी केली नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी नेगारचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यास, तिच्या आधीच्या आणि आताच्या फोटोंमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो.

नेगार तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिली. तिने ‘स्टाइल’ फेम अभिनेता साहिल खानशी लग्न केलं होतं. परंतु हे लग्न फार काळ टिकलं नाही. अवघ्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. व्हिसा वाद आणि कायदेशीर अडथळ्यांमुळे त्यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जातं.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.