AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पल काढून मारेन… जेव्हा सगळ्यांसमोर अजयवर भडकली होती काजोल, अवतार पाहून सर्व थक्क !

अभिनेत्री काजोल ही तिचा फटकळ स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या स्वभावाचा फटका तिचा नवरा, अभिनेता अजय देवगणलाही बसला आहे आणि तोही सर्वांसमोरच, नॅशनल टेलिव्हिजनवर...

चप्पल काढून मारेन... जेव्हा सगळ्यांसमोर अजयवर भडकली होती काजोल, अवतार पाहून सर्व थक्क !
Image Credit source: instagram
| Updated on: May 24, 2023 | 12:33 PM
Share

मुंबई : अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) हे बी-टाऊनमधील एक लोकप्रिय कपल आहेत. या दोघांनीही 24 फेब्रुवारी 1999 साली लग्न केले. लग्नाला दोन दशकांचा काळ उलटून गेल्यानंतरही ते इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली व त्यांची चांगली मैत्री देखील झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले व अखेर त्यांनी एकमेकांशी लग्न केले.

मात्र या दोघांचे स्वभाव अतिशय भिन्न आहेत. अजय हा शांत, संयमी म्हणून ओळखला जातो. तर काजोल ही तिचा फटकळ स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या स्वभावाचा फटका तिचा नवरा, अभिनेता अजय देवगणलाही बसला आहे. नॅशनल टेलिव्हिजनवरच काजोलने अजयला उद्देशून अपशब्द उच्चारले होते, जे ऐकून सर्वजण अवाक् झाले होते. चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे ?

खरंतर अजय-काजोलचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये ते दोघं आले होते. त्यामध्ये या दोघांनी भरपूर गप्पा मारत मस्तीही केली. त्याच शोमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अजयने जे उत्तर दिले ते ऐकून काजोलन अजयला मार खायचा आहे का, असे विचारले.

झालं असं की करणने अजयला एक प्रश्न विचारला होता. काजोलच्या अपोझिट सध्याचा कोणता अभिनेता चांगला दिसेल ? त्यावर अजयने उत्तर देत प्रतिप्रश्न केला की म्हणजे (तिच्या) मुलाच्या भूमिकेत ? अजयने मजेत दिलेलं हे उत्तर ऐकून काजोल चिडली आणि त्याला (मजेतच) शिव्या घालू लागली. एवढंच नव्हे तर तिने ‘चप्पल काढून मारेन’ असे शब्दही उच्चारले.

तिचे हे बोलणे ऐकून करण जोहरसह सर्वजण अवाक् झाले आणि करणने लगेचच तिला असं बोलण्यापासून मनाई केली. या शोमध्ये, टीव्हीवर तू असं बोलू शकत नाहीस, असं सांगत करणने तिला पुढे बोलण्यापासून रोखलं. मात्र हे सर्व घडत असताना अजय शांतपणे बसून हसत होता. त्याने काजोलच्या बोलण्यावर, चिडण्यावर काहीही रिॲक्शन दिली नाही. तो फक्त हसत राहिला. त्या दोघांचा हा मजेदार व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल झाला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.