AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : इंटिमेट सीन, सैफ अली खानच्या कृत्यावर भडकली कंगना रनौत

Kangana Ranaut : इंटिमेट सीन देताना सैफ अली खान याच्यावर का भडकली कंगना रनौत? सध्या सर्वत्र कंगना रनौत आणि सैफ अली खान यांची चर्चा... दोघांचे वाद मिटवण्यासाठी 'या' व्यक्तीने घेतला पुढाकार... कंगना कायम वादग्रस्त वक्तव्य आणि परिस्थितींमुळे चर्चेत असते...

Kangana Ranaut : इंटिमेट सीन, सैफ अली खानच्या कृत्यावर भडकली कंगना रनौत
| Updated on: Oct 31, 2023 | 7:50 PM
Share

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगना तिच्या सिनेमांमुळे कमी तर, वादग्रस्त वक्तव्य आणि परिस्थितींमुळे चर्चेत असते. ज्यामुळे अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. सध्या फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगत आहे. आता देखील अभिनेत्री संबंधीत एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. शुटिंग सुरु असताना कंगना अभिनेता सैफ अली खान याच्यावर भडकली होती. इंटिमेट सीन शूट करताना कंगना अभिनेत्यावर भडकली होती.. असं अनेकदा समोर आलं आहे.

रिपोर्टनुसार, सिनेमात सैफ अली खान आणि कंगना रनौत इंटिमेट सीन देण्यासाठी तयार झाले होते. तेव्हा सैफ याचं लक्ष शुटकडे नव्हते. अभिनेता चेहऱ्या विनोदी हावभाव दाखवत होता. तेव्हा भडकलेल्या कंगना हिने सैफ याला शुटकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, कंगना रागात म्हणाली, ‘काय सुरु आहे सैफ…. आपण एका सिनेमाचं शुटिंग करत आहोत. प्रत्येक गोष्टींचा विनोद करु नकोस. शुटिंग आहे. गांभीर्याने विचार कर… कोणत्याही गोष्टीची खिल्ली उडवू नको, एक महत्त्वाच्या सीनचं शुटिंग सुरु आहे…’ तेव्हा भडकलेल्या कंगना हिला सिनेमाच्या दिग्दर्शकांनी देखील समजावलं.

सांगायचं झालं तर, ‘रंगून’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा हा किस्सा आहे. ‘रंगून’ सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात कंगना रनौत, सैफ अली खान यांच्यासोबत अभिनेता शाहीद कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विशाल भरद्वाज याच्यावर होती.

कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘तेजस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करत नसल्याचं चित्र समोर येत आहे. कंगना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

कंगना रनाैतचा (Kangana Ranaut) आगामी इमर्जन्सी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. इमर्जन्सी चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारत आहे.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.