AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2005 मध्ये नाना पाटेकरांना झाली असती अटक, रागामुळे ओढवले होते संकट, कोर्टाच्या माराव्या लागल्या होत्या चकरा

12 मे 2005 रोजी नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात केलेलं अस काही की होणार होती अटक. नानांना कोर्टात माराव्या लागल्या होत्या चकरा. नेमकं काय घडलेलं?

2005 मध्ये नाना पाटेकरांना झाली असती अटक, रागामुळे ओढवले होते संकट, कोर्टाच्या माराव्या लागल्या होत्या चकरा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 10, 2026 | 1:49 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, परखड स्वभाव आणि रागीट व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, मे 2005 मध्ये एका रोड रेज प्रकरणामुळे नाना पाटेकर मोठ्या अडचणीत सापडले होते. एका उद्योगपतीला धमकावल्याचा आणि त्याच्यावर परवानाधारक रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे 2005 रोजी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर नाना पाटेकर यांच्या कारची उद्योगपती उत्कर्ष मोरारका यांच्या स्कॉर्पिओला धडक लागली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. मोरारका यांच्या तक्रारीनुसार, वाशी टोलनाक्यावर पाटेकर यांनी त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि रिव्हॉल्व्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली.

नाना पाटेकरांना मिळालेला अटकेपासून दिलासा

13 मे 2005 रोजी नाना पाटेकर यांनी वकील नीलेश पावस्कर यांची भेट घेतली होती. अटकेची भीती असल्याने ते अटकपूर्व जामिनासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आले होते. मात्र, पाटेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. उलट, मोरारका यांनीच वारंवार त्यांच्या गाडीला धडक दिली आणि वाशी टोलनाक्यावर त्यांना मारहाण केली, असा दावा पाटेकर यांनी केला होता.

यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आणि सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्यास सांगितले. सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, तसेच चौकशीसाठी देवनार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पाटेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला.

2007 मध्ये प्रकरणाला मिळालं वेगळं वळण

या प्रकरणाला जानेवारी 2007 मध्ये वेगळे वळण मिळाले. उत्कर्ष मोरारका यांनी न्यायालयात हे प्रकरण पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि या प्रकरणातील कायदेशीर टांगती तलवार दूर झाली.

विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांनी 2013 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक्स ऑफ 26/11’ या चित्रपटात तत्कालीन गुन्हे शाखा प्रमुख राकेश मारिया यांची भूमिका साकारली होती. पुढे मारिया यांच्या ‘व्हेन इट ऑल बिगन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातही पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एका बाजूला पडद्यावर पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका साकारणारे नाना पाटेकर आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच एका गंभीर पोलिस तक्रारीत अडकलेले नाना पाटेकर असा त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग त्या काळात चर्चेचा विषय ठरला होता.

Follow Us
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?