AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्नांनी डिंपलच्या बहिणीला म्हटलं होतं ‘कचरा’, ‘बदसूरत’ म्हणून केलं होतं रिजेक्ट, कारण ऐकून…

राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाच्या बहिणीला कचरा, बदसूरत म्हणून केलं होतं रिजेक्ट. नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर

राजेश खन्नांनी डिंपलच्या बहिणीला म्हटलं होतं ‘कचरा’, ‘बदसूरत’ म्हणून केलं होतं रिजेक्ट, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 08, 2026 | 2:16 PM
Share

बॉलिवूडच्या इतिहासात डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची प्रेमकहाणी आणि वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. मात्र, डिंपलची धाकटी बहीण सिंपल कपाडिया हिचाही चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध होता. अभिनेत्री म्हणून फार मोठे यश मिळवता आले नसले तरी पुढे कॉस्च्युम डिझायनर म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

डिंपल कपाडियाने अवघ्या 16 व्या वर्षी 1973 मध्ये राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत ऋषी कपूर दिसले होते. त्यावेळी सिंपल बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होती. वर्तमानपत्रातून डिंपल आता चित्रपटात काम करणार असल्याचे समजल्यानंतर सिंपलला मोठा धक्का बसला होता.

‘माझे त्यांच्यासोबत कधीच जमले नाही’

डिंपलने राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर सिंपलही त्यांच्यासोबत त्याच घरात राहत होती. ती गंमतीने स्वतःला ‘डिंपलच्या दहेजाचा हिस्सा’ म्हणायची. मात्र, डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या वैवाहिक आयुष्यात सुरुवातीपासूनच अडचणी होत्या.

1986 मधील एका मुलाखतीत सिंपलने या नात्याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले होते. एकाच घरात राहत असूनही डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या नात्यातील समस्यांची गंभीरता आपल्याला कळली नव्हती, असे तिने सांगितले. तसेच, ‘माझे त्यांच्यासोबत कधीच जमले नाही’, असेही तिने स्पष्ट केले होते.

राजेश खन्ना यांना ‘मुश्किल व्यक्ती’ असे संबोधत सिंपलने ‘अनुरोध’च्या शूटिंगदरम्यानचा अनुभवही सांगितला. पहिला चित्रपट असल्याने ती प्रचंड घाबरलेली होती. मात्र, राजेश खन्ना यांनी तिला संवादांच्या रिहर्सलमध्येही मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे ती जवळपास रडण्याच्या अवस्थेत पोहोचली होती.

दिग्दर्शक शक्ती सामंतांनी राजेश खन्नांना सुनावले

सिंपलच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती पाहून ‘अनुरोध’चे दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी राजेश खन्ना यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, ते सुपरस्टार असले तरी सिंपल त्यांच्या साली असण्यापेक्षा सेटवर एक नवोदित अभिनेत्री आहे आणि तिच्याशी आदराने वागले पाहिजे.

यानंतर राजेश खन्ना यांनी दिग्दर्शकांचे म्हणणे मान्य केले आणि सिंपलला सहकार्य केले. ‘डिंपलनंतर प्रेक्षकांनी तिच्या बदसूरत बहिणीला स्वीकारले नाही’, अशी टीका

‘अनुरोध’ अपयशी ठरल्यानंतर सिंपलला तिच्या दिसण्यावरूनही टीकेचा सामना करावा लागला. डिंपलच्या सौंदर्याशी तिची तुलना करत तिला ‘बदसूरत बहीण’ असेही म्हटले गेले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?