AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava: जेव्हा राजू यांची पत्नी होती बंदुकीच्या निशाण्यावर; 12 वर्षीय मुलीने दाखवलं मोठं धाडस

राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळाला होता शौर्य पुरस्कार; जाणून घ्या त्या घटनेबद्दल

Raju Srivastava: जेव्हा राजू यांची पत्नी होती बंदुकीच्या निशाण्यावर; 12 वर्षीय मुलीने दाखवलं मोठं धाडस
Antara SrivastavaImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Sep 21, 2022 | 5:00 PM
Share

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. राजू यांच्या पश्चात पत्नी शिखा श्रीवास्तव, मुलगी अंतरा (Antara Srivastava) आणि मुलगा आयुष्मान असा परिवार आहे. राजू यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अंतरा ही विशेष चर्चेत आली आहे. यामागाचं कारण म्हणजे तिने वयाच्या 12 व्या वर्षी केलेलं धाडसी कृत्य. ज्यासाठी तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार तिला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

वयाच्या 12 व्या वर्षी अंतरा श्रीवास्तवने अत्यंत धाडसी कृत्य केलं होतं. तिच्या या कृत्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला होता. राजू श्रीवास्तव यांच्या घरी काही चोर चोरीसाठी आले होते. त्यावेळी अंतरा फक्त 12 वर्षांची होती. घरात अंतरा आणि तिच्या आईशिवाय कोणीच नव्हतं. चोरट्यांनी राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्यावर बंदुक धरली होती. बंदुकीचा धाक दाखवून ते चोरी करत होते.

ही घटना घडली तेव्हा अंतरा तिच्या बेडरूममध्ये होती. तिथून तिने थेट पोलिसांना फोन करून त्यांची मदत घेतली. त्याचवेळी खोलीच्या खिडकीतून तिने हळूच इमारतीच्या चौकीदाराला आवाज दिला. अंतराने चोरांचा धैर्याने सामना केला. अंतराच्या या कृतीमुळे पोलीस आणि चौकीदाराने वेळीच तिला आणि तिच्या आईला चोरांपासून वाचवलं होतं.

या धाडसासाठी अंतराला 2006 मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून तिला हा पुरस्कार मिळाला होता. त्या दहा मिनिटांच्या घटनेनं अंतराचं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं. आपल्या मुलीच्या या धाडसाने राजू यांनाही खूप आनंद झाला होता. मुलीला शौर्य पुरस्कार मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

अंतरा सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने फ्लाइंग ड्रीम एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 2013 मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ यांसारख्या चित्रपटांसाठी तिने काम केलं आहे.

Follow Us
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू