AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava: राजू यांच्या निधनावर ढसाढसा रडली पत्नी; म्हणाली “त्यांनी खूप संघर्ष केला, पण..”

राजू यांच्याविषयी बोलताना पत्नीला अश्रू अनावर; शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नव्हती आशा

Raju Srivastava: राजू यांच्या निधनावर ढसाढसा रडली पत्नी; म्हणाली त्यांनी खूप संघर्ष केला, पण..
Raju and Shikha SrivastavaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 21, 2022 | 3:37 PM
Share

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 42 दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना आज (बुधवारी) सकाळी 10.20 वाजता मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी शिखा (Shikha Srivastava) ढसाढसा रडल्या.

10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजू बरेच दिवस शुद्धीवर आले नव्हते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल केल्यापासून ते व्हेंटिलेटरवरच होते.

एका वेब पोर्टलशी बोलताना पत्नी शिखा यांना अश्रू अनावर झाले. “मी सध्या व्यक्तच होऊ शकत नाही. मी काय बोलू हेच मला कळत नाहीये. त्यांनी खूप संघर्ष केला. मी खरोखरच आशा करत होते आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. पण असं झालं नाही. त्यांच्या  शेवटच्या श्वासापर्यंत मी आशा सोडली नव्हती. मी एवढंच म्हणेन की ते खरे लढवय्ये होते.”

राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. राजू यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी शिखा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राजूच्या वाईट काळातही शिखाने त्यांची साथ दिली.

राजू यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी, चाहते आणि राजकारण्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राजू यांच्या पार्थिवावर गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर सकाळी 9.30 वाजता अंत्यविधी पार पडतील.

Follow Us
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत