AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिकाऱ्याच्या वेशात या प्रसिद्ध गायकाने 3 तास रस्त्यावर गायली गाणी, एका मुलाने दिले 12 रुपये अन् म्हणाला…

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध गायकाने जेव्हा भिकाऱ्याच्या वेशात बसून भर रस्त्यावर जेव्हा गायली गाणी. तेव्हा एका मुलाने त्यांच्या हातावर दिले होते 12 रुपये. त्याचे शब्द ऐकून गायक झालेला भावूक.

भिकाऱ्याच्या वेशात या प्रसिद्ध गायकाने 3 तास रस्त्यावर गायली गाणी, एका मुलाने दिले 12 रुपये अन् म्हणाला...
| Updated on: Aug 20, 2026 | 5:07 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे वेगवेगळ्या लुकमुळे अनेकदा प्रेक्षकांना ओळखू देखील येत नाहीत. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकदा आपल्या चाहत्यांना आणि सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करणारा एक अनोखा प्रयोग केला होता. 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्याच्या कडेला बसत तब्बल तीन तास गाणी गायली होती. विशेष म्हणजे, या काळात त्यांना पाहणाऱ्या जवळपास कोणालाही ते सोनू निगम आहेत याची कल्पना आली नाही.

सोनू निगम यांनी खराब मळलेले कपडे परिधान करून हार्मोनियम घेतला आणि रस्त्यावर बसून गाणी म्हणण्यास सुरुवात केली. हा प्रयोग एका सोशल एक्सपेरिमेंटचा भाग होता. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे एक-एक तास गाणी गायली आणि अनेक गाणी सादर केली. वाहतूक, गर्दी आणि आजूबाजूच्या गोंगाटात मायक्रोफोनशिवाय गाणे गाणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते.

सोनू निगम यांनी नंतर सांगितले होते की, लोक त्यांच्या आजूबाजूला जमू लागल्यावर त्यांना आपली खरी ओळख समोर येईल याची भीती वाटत होती. रस्त्यावर बसून गाणे हा त्यांच्यासाठी अत्यंत नम्र करणारा आणि वेगळा अनुभव होता.

मात्र या संपूर्ण प्रयोगादरम्यान एक घटना सोनू निगम यांच्या मनाला चांगलीच भिडली. एक लहान मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने सोनू निगम यांचा हात हातात घेतला आणि, ‘अंकल, तुम्ही नाश्ता केला का?’ असे विचारले. त्यानंतर त्या मुलाने कुणालाही न कळता त्यांच्या हातात 12 रुपये ठेवले.

View this post on Instagram

A post shared by La Musica (@lamusicalive247)

ते 12 रुपये आजही आठवणीत

या छोट्याशा मदतीने सोनू निगम भावूक झाले. त्यांनी सांगितले होते की, त्या मुलाने हातात ठेवलेले 12 रुपये आपल्यासाठी लाखो रुपयांपेक्षा मौल्यवान होते. त्यामुळे त्यांनी ते पैसे आपल्या ऑफिसमध्ये फ्रेम करून जपून ठेवण्याचा निर्णय घेतला.

या मुलाचे नाव शाहबाज असल्याचे समोर आले. सोनू निगम यांनी त्याचा शोध घेऊन त्याला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले. विशेष म्हणजे, शाहबाजला आपण ज्याला रस्त्यावर भिकारी समजून 12 रुपये दिले होते ते प्रत्यक्षात प्रसिद्ध गायक सोनू निगम होते याची अजिबात कल्पना नव्हती. शाहबाज आणि सोनू निगम यांची भेट झाल्यानंतर हा प्रसंग आणखी भावूक झाला. एका अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी दिलेली अवघी 12 रुपयांची रक्कम सोनू निगम यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण ठरली.

Follow Us
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?