AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर भाजपचाच फायदा? कसा? प्रकाश आंबेडकरांनी दिली मोठी माहिती

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने भाजपचाच राजकीय फायदा होईल, असे भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर भाजपचाच फायदा? कसा? प्रकाश आंबेडकरांनी दिली मोठी माहिती
prakash ambedkar news Image Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 5:14 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादाचं प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे या प्रकरणात ठाकरेंच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. परंतु चिन्ह गोठवल्यास भाजपचा फायदा होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलाय. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा भाजपला याचा फायदा होईल’.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. चिन्ह गोठवण्याचा फायदा अमित शाह, भाजप घेऊ शकते. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी भाजपचा फायदा होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

कोर्टाच्या निर्णयानंतर फोडाफोडीचं प्रमाण दिसेल – आंबेडकर

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, परंतु जंतरमंतरवरील आंदोलनामुळे आळा बसला होता. कोर्टाचा निर्णयानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसून शकते. राजकीय पक्षांच्या वादात मूळ कायदेशीर क्षेत्राचा प्रश्न डावलला जातोय. सादिक अली खटल्याच्या वेळी राजकीय पक्षांची नोंदणी सक्तीची नव्हती. ते केवळ एक असोसिएशन म्हणून कार्यरत होते, त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार होता. मात्र, १९८९ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून कलम २९ (अ) समाविष्ट करण्यात आलं. यामुळे राजकीय पक्षांचे कायदेशीर अस्तित्व निर्माण झालं. नागरी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कायद्याने काढून घेतलेले नसताना, राजकीय पक्षांमधील अंतर्गत भांडणे सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून नागरी न्यायालयांनाच आहे. निवडणूक आयोगाला नागरी अधिकार क्षेत्र नसतानाही अशा प्रकारे निर्णय दिले जाणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही’.

Follow Us
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?