3 Idiots सिनेमातील सायलेन्सर आहे तरी कुठे… 16 वर्षांनंतर काय करतोय ओमी वैद्य?
3 Idiots : अभिनेता आमिर खान स्टारर '3 इडियट्स' सिनेमाने प्रेक्षकांचं फक्त मनोरंजनच केलं नाही तर, एक मोठा संदेश देखील सिनेमाने दिला. पण सिनेमात एका भूमिकेची तुफान चर्चा रंगली आणि ती म्हणजे 'सायलेन्सर' याची... अभिनेता ओमी वैद्य आता काय करतोय घ्या जाणून...

3 Idiots : अभिनेता आमिर खान याने बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले. त्यामधील एक सिनेमा म्हणजे ‘3 इडियट्स’… जीवनाचा खरा अर्थ सांगण्याऱ्या सिनेमाने मोठ्या बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कामगिरी केली. सांगायचं झालं तर, प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा प्रदर्शित होतो… बॉक्स ऑफिसवर कमाई करतो आणि काही काळानंतर सिनेमाची चर्चा देखील रंगत नाही. पण सिनेमातील काही भूमिका अशा असतात त्या कधीच विसरता येत नाही. अशाच भूमिकेमधील एक भूमिका म्हणजे ‘सायलेन्सर’ अभिनेता ओमी वैद्य याने सिनेमात सायलेन्सर ही भूमिका बजावली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं… पण आता म्हणजे 16 वर्षांनंतर अभिनेता काय करतोय… याबद्दल कोणाला माहिती नसेल…
ओमी याने अभिनयाची सुरुवात अमेरिकन टीव्ही शोमधून केली. अभिनेत्याने द ऑफिस आणि अरेस्टेड डेवलपमेंट यांसारख्या शोमध्ये काम केलं आहे. पण दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘3 इडियट्स’ या सिनेमाक चतुर, ज्याला सायलेन्सर म्हणूनही ओळखले जाते, त्याची भूमिका साकारण्यासाठी त्याला ओळख मिळाली. पण, अभिनेत्याने या भूमिकेसाठी ऑडिशन दिलंच नव्हतं. अभिनेत्याने अभिनेता शरमन जोशी याच्या राजू या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. पण हिंदी भाषेवर पकड नसल्यामुळे काम मिळणार नाही… असं देखील अभिनेत्याला वाटलं.
ओमी म्हणाला, ‘निर्मात्यांचा मला पुन्हा फोन आला आणि त्यांनी संजय दत्त स्टारर ‘लगे रहो मुन्ना भाई’ सिनेमाची स्क्रिप्ट मला दिली आणि प्रॅक्टिस करण्यास सांगितलं… तेव्हा मी सिनेमा पाहिला देखील नव्हता… मी ऑडिशन दिलं पण माझ्याकडून अनेक चुका झाल्या. मला माहिती होतं, सिनेमात काम मिळणार नाही… पण मला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. पण राजकुमार हिराणी यांनी मला स्पष्ट सांगितलं की, तुला हिंदी भाषेवर काम करावं लागले..’
आता काय करतोय ‘3 इडियट्स’ सिनेमातील सायलेन्सर?
‘3 इडियट्स’ सिनेमानंतर ओमी वैद्य याने देसी ब्वॉयज, प्लेयर्स, मिरर गेम आणि ब्लैकमेल यांसारख्या सिनेमांमध्ये कायम केलं. मेट्रो पार्क या वेब सीरिजमध्ये देखील तो दिसला… शिवाय एका मराठी सिनेमाचं त्याने दिग्दर्शन देखील केलं आहे…
आता ओमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेता कायम स्वतःचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असतो. इन्स्टाग्रामवर ओमी याचे तब्बल 3 लाख 44 हजार फॉलोअर्स आहेत. ओमी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
