AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय जीसस, श्री अल्लाह.. शाहिद कपूरचा भाऊ कोणता धर्म पाळतो?

अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरला नुकतंच एका चाहत्याने त्याच्या धर्माबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ईशानने जे उत्तर दिलं, ते वाचून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. ईशान हा राजेश खट्टर आणि निलिमा अझीम यांचा मुलगा आहे.

जय जीसस, श्री अल्लाह.. शाहिद कपूरचा भाऊ कोणता धर्म पाळतो?
शाहिद कपूर, ईशान खट्टरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2026 | 1:27 PM
Share

अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर अनेकदा त्याच्या धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. इशानची आई मुस्लीम असून त्याचे वडील हिंदू आहेत. आता पुन्हा एकदा त्याने यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर नुकतंच एका चाहत्याने त्याला त्याच्या धर्मावरून प्रश्न विचारला. त्यावर इशानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. इशान हा शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. त्याची आई निलिमा अझीम असून वडील राजेश खट्टर आहेत. तर शाहिद कपूर हा निलिमा अझीम आणि त्यांचे पहिले पती पंकज कपूर यांचा मुलगा आहे. त्यामुळे ईशान विविध सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभावांनी समृद्ध असलेल्या घरात लहानाचा मोठा झाला आहे.

इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान एका चाहत्याने ईशानला विचारलं, ‘तुझा धर्म कोणता आहे? मी थोडा कन्फ्युज (संभ्रमात) झालो आहे.’ त्यावर उत्तर देताना ईशानने लिहिलं, ‘जय जिसस, श्री अल्लाह, होली स्पिरिट दी फतेह.’ ईशानच्या या उत्तराने नेटकरी आणखीनच संभ्रमात पडले. त्यानंतर मात्र त्याने जे लिहिलं, ते वाचून नेटकरी त्याचं कौतुक करू लागले. ईशानने पुढे लिहिलं, ‘निसर्ग, दयाळूपणा, माणुसकी आणि सृष्टी..’ त्याच्या या अनोख्या उत्तराने चाहतेही प्रभावित झाले.

ईशान खट्टरचं उत्तर-

ईशानचे वडील अभिनेते राजेश खट्टर हिंदू आहेत, तर त्याची आई निलिमा अझीम मुस्लिम कुटुंबातील आहे. मात्र ईशान धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि शांतता या गोष्टींवर अधिक भर देतो. ईशान खट्टरने 2017 मध्ये त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. ‘बियाँड द क्लाऊड्स’ हा त्याचा पहिला मुख्य अभिनेता म्हणून चित्रपट होता. त्यानंतर त्याने ‘होमबाऊंड’, ‘खाली पिली’, ‘फोन भूत’, ‘पिप्पा’ आणि ‘धडक’ यांसारख्या चित्रपाटंमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ईशान लवकरच ‘जुगाडू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिद कपूर हा ईशानचा सावत्र भाऊ असला तरी या दोघांमध्ये चांगलं नातं आहे.

एका मुलाखतीत ईशान त्याच्या आईबद्दल म्हणाला होता, “मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे. मी तिला खूप संघर्ष करताना पाहिलं आहे. ती खूप धाडसी आहे. आज मी जो कोणी आहे, तो तिच्यामुळेच आहे. मी असे दिवस पाहिले आहेत किंवा मी अशा वातावरणात राहिलोय.. असं मी काही बोलणार नाही. कारण प्रत्येकाने काही ना काही झेललेलंच असतं.”

Follow Us
तासाभरात स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा....
Sanjay Shirsat | तासाभरात सर्व स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा, नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जलद घडामोडी! अधिकृत घोषणा कधी? नव्या
'ऑपरेशन टायगर'ची अधिकृत घोषणा कधी? मुहूर्त ठरला... थेट शिंदेच...
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना सर्वात मोठा दणका; थेट...
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट!
अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, दिल्ल
मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच...
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; 6 खासदारांच्या फुटीनंतर उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Big Breaking | व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच दिली महत्त्वाची माहिती; अखेरचा...
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार...
तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही
Sanjay Raut | तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही; राऊतांचा बंडखोरांना इशारा