Karan Deol | कोण आहे सनी देओलची होणारी सून? मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा?

करणने 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो 'अपने के अपने 2' या चित्रपटात दिसणार आहे.

Karan Deol | कोण आहे सनी देओलची होणारी सून? मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा?
Sunny and Karan DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 5:11 PM

मुंबई : अभिनेता सनी देओल यांच्या घरात लवकरच सून येणार असल्याच्या चर्चांना गुरुवारपासून उधाण आलंय. सनी देओलचा मुलगा करण देओल हा पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. करण देओलची होणारी पत्नी नेमकी कोण आहे, याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र ती फिल्म इंडस्ट्रीतली नाही, असं सांगण्यात येतंय. करणच्या लग्नाची किंवा साखरपुड्याची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीसुद्धा त्याने दृशा रॉयशी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

करण देओलने दृशा रॉयशी केला साखरपुडा?

सनी देओलचा मुलगा करणने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करण आणि दृशा एकमेकांना डेट करत असून पुढच्या महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय. करण आणि दृशा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे दृशा रॉय?

दृशा रॉय ही फॅशन डिझायनर असून करणप्रमाणेच तीसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे. तिचे पणजोबा बिमल रॉय हे महान भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. बिमल रॉय यांचे चित्रपट वास्तववादी आणि समाजवादी विषयांसाठी ओळखले जायचे. दो बिघा जमीन, परिणीता, देवदास, मधुमती, सुजाता, पारख आणि बंदिनी यांसारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Drisha Roy (@drisharoyy)

आता पुन्हा एकदा करण आणि दृशा यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे. आजोबा धर्मेंद्र आणि आजी प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

करणने ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो ‘अपने के अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्रसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

माहितीनुसार, करण देओल ज्या मुलीसोबत लग्न करणार आहे ती फिल्म इंडस्ट्रीतील नाहीये. तसंच करण त्याच्या मंगेतराला खूप दिवसांपासून डेट करत होता. त्यांचं लग्न अगदी साधेपणाने होणार असून त्यात फक्त जवळचे नातेवाईकच सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.