.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आभाळमाया’, ‘होणार सून…’ ते ‘मन बावरे’, मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?

हे मन बावरे मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने केला आहे (Marathi Serial Director Mandar Devasthali )

'आभाळमाया', 'होणार सून...' ते 'मन बावरे', मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 22, 2021 | 11:46 AM
Share

मुंबई : मराठी मालिका विश्वात दबदबा असलेले प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. आभाळमाया, वादळवाटपासून होणार सून मी या घरची, हे मन बावरेपर्यंत अनेक मालिकांची धुरा देवस्थळींनी सांभाळली आहे. मात्र ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला जात आहे. (Who is Marathi Serial Director Mandar Devasthali accused of not paying Actors Payment)

शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्ट करुन मानधन थकवल्याचे समोर आणले आहे. शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होती. शशांक केतकरने साकारलेल्या सिद्धार्थच्या बहिणीची म्हणजेच संयोगिताची व्यक्तिरेखा तिने साकारली होती.

शर्मिष्ठाला सहकलाकारांचा पाठिंबा

या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठाने केला आहे. शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.

मंदार देवस्थळी यांचा दबदबा

2000 मध्ये त्यावेळच्या अल्फा मराठीवर गाजलेल्या ‘आभाळमाया’ मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं होतं. ‘बोक्या सातबंडे’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘जिवलगा’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’, ’गुलमोहर’, ‘हे मन बावरे’ अशा एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत.

व्यक्तिरेखांच्या डिटेलिंगसाठी प्रख्यात

‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’ होणार सून मी ह्या घरची’ या झी मराठीवरील मालिका विशेष गाजल्या आहेत. ‘आभाळमाया’ मालिकेतील सुधा जोशी, ‘वादळवाट’मधील रमा चौधरी, आबा चौधरी, ‘अवघाची संसार’मधील सोशीक आसावरी आणि रागीट हर्षवर्धन, किंवा ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्री-जान्हवी या व्यक्तिरेखांना विशेष पसंती मिळाली. व्यक्तिरेखेचं डिटेलिंग करण्यासाठी देवस्थळी प्रसिद्ध आहेत.

शशांकसोबत जोडी जमली

शशांक केतकर हा मंदार देवस्थळींचा लकी चार्म असावा. आधी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्रीची व्यक्तिरेखा शशांकने साकारली होती. या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘हे मन बावरे’ मालिकेतही सिद्धार्थच्या भूमिकेत तो झळकला. या मालिकेलाही अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

क्षण या 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी सिनेमा विश्वात पाऊल ठेवलं. 2017 मध्ये देवस्थळींची पहिली निर्मिती असलेल्या कच्चा लिंबू या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (Who is Marathi Serial Director Mandar Devasthali accused of not paying Actors Payment)

मंदार देवस्थळी यांच्या गाजलेल्या मालिका

‘बोलाची कढी’, ‘नातीगोती’,’सांगाती’, ‘वळवाचा पाऊस’, ‘मानामनाची व्यथा’, ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’,’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’,’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’,’गुलमोहर’,’सूर राहू दे’, ‘हे मन बावरे’.

संबंधित बातम्या :

आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल

घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप

(Who is Marathi Serial Director Mandar Devasthali accused of not paying Actors Payment)

Follow Us
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक