AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Leonardo DiCaprio | ‘टायटॅनिक’ स्टार या भारतीय मॉडेलला करतोय डेट? दोघांच्या वयात 20 वर्षांचं अंतर

नीलमला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यातही पाहिलं गेलं होतं. या सोहळ्यातील फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याआधी ती भारतात डायर (Dior) या प्रतिष्ठित ब्रँडसाठी रॅम्प वॉक करताना दिसली होती.

Leonardo DiCaprio | 'टायटॅनिक' स्टार या भारतीय मॉडेलला करतोय डेट? दोघांच्या वयात 20 वर्षांचं अंतर
Leonardo DiCaprio and Neelam GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 3:36 PM

मुंबई : हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘टायटॅनिक’ अनेकांना माहीतच असेल. यामध्ये अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रियोने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. सध्या लिओनार्डो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लिओनार्डोचं नाव भारतीय वंशाची मॉडेल नीलम गिलशी जोडलं जातंय. या दोघांच्या वयात 20 वर्षांचं अंतर आहे. लिओनार्डो 48 तर नीलम 28 वर्षांची आहे.

पेज सिक्सच्या रिपोर्टनुसार नीलमला लंडनमधील चिल्टन फायरहाऊसमध्ये लिओनार्डोसोबत पाहिलं गेलंय. तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय. टायटॅनिक स्टारला डेट करणारी ही भारतीय वंशाची मॉडेल आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

हे सुद्धा वाचा

नीलम गिल ही भारतीय वंशाची मॉडेल असून तिचा जन्म 1995 मध्ये लंडनमध्ये झाला. तिचे आईवडील युकेमध्येच असतात. तर नीलमचे आजी-आजोबा भारतातील पंजाबमध्ये राहणारे होते. एका मुलाखतीत तिने तिच्या कुटुंबाविषयी खुलासा करत सांगितलं होतं की जेव्हा ती छोटी होती तेव्हा तिचे आई-बाबा विभक्त झाले. घटस्फोटानंतर वडिलांशी कोणताच संपर्क नसल्याचंही तिने सांगितलं. तर विभक्त झाल्यानंतर नीलमच्या आईने दुसरं लग्न केलं.

View this post on Instagram

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

नीलमने मॉडेलिंग विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती स्वत:ला ब्रिटीश-पंजाबी मॉडेल मानते. अवघ्या 14 व्या वर्षी तिने मॉडेलिंगमधील करिअरची सुरुवात केली आहे. बर्बेरी कँपेनमध्ये पहिली भारतीय मॉडेल म्हणून तिने इतिहास रचला आहे. ती अमेरिकी लाइफस्टाइल रिटेलर एबरक्रॉम्बी अँड फिचचाही चेहरा होती.

नीलमला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यातही पाहिलं गेलं होतं. या सोहळ्यातील फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याआधी ती भारतात डायर (Dior) या प्रतिष्ठित ब्रँडसाठी रॅम्प वॉक करताना दिसली होती. लिओनार्डो याआधी मॉडेल आणि अभिनेत्री कॅमिला मोरोनेला डेट करत होता. या दोघांचं गेल्याच वर्षी ब्रेकअप झालं. जवळपास चार वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.