AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे Neem Karoli Baba, ज्यांच्या आशीर्वादाने धन्य झाले विराट-झुकरबर्ग यांसारखे सेलिब्रिटी?

करोली बाबा यांच्यावर विराट-झुकरबर्ग यांसारख्या सेलिब्रिटींची श्रद्धा; नुकताच कोहली कुटुंबाने घेतली त्यांची भेट

कोण आहे Neem Karoli Baba, ज्यांच्या आशीर्वादाने धन्य झाले विराट-झुकरबर्ग  यांसारखे सेलिब्रिटी?
कोण आहे Neem Karoli Baba, ज्यांच्या आशीर्वादाने धन्य झाले विराट-झुकरबर्ग यांसारखे सेलिब्रिटी?
| Updated on: Jan 13, 2023 | 12:49 PM
Share

Neem Karoli Dham: नीम करोली बाबा (Neem Karoli Baba) यांचे जगभरात असंख्य फॉलोअर्स आहेत. नीम करोली बाबा यांना करौरी बाबा (Neeb Karori Baba) म्हणून देखील ओळखलं जातं. नीम करोली बाबा एक हिंदू धर्मगूरु आहेत. त्यांना अनुयायी महाराज म्हणून देखील ओळखलं जातं. नीम करोली बाबा बजरंग बली यांचे भक्त असल्याचं सांगण्यात येतं. नीम करोली बाबा कायम भक्तांची सेवा करण्यात व्यस्त असतात. देवाची भक्ती एक उत्तम माध्यम असल्याचं देखील करोली बाबा सांगत असल्याची चर्चा आहे.

कोण आहे करोली बाबा? रिपोर्टनुसार, नीम करोली बाबा यांचा जन्म लक्ष्मण नारायण शर्मा यांच्या घरी झाला होता. फार कमी वयात त्यांनी घर सोडलं आणि संत म्हणून स्वतःचा प्रवास सुरु केला. वडिलांनी समजाल्यानंतर करोली बाबा पुन्हा घरी परतले. पण १९५८ मध्ये त्यांनी पुन्हा घर सोडलं. त्यानंतर अनेक गावांमध्ये फिरत असताना त्यांनी एक आश्रम आणि हनुमान यांचं मंदिर बांधलं.

केव्हा प्रसिद्ध झाले करोली बाबा? नीम करोली बाबा १९६० आणि ७० साली प्रचंड प्रसिद्ध झाले. महत्त्वाचं म्हणजे अनेक अमेरिकन नागरिक जेव्हा भारतात नीम करोली बाबा यांच्या दर्शनासाठी आले, तेव्हा देखील बाबा चर्चेत आल्याचं सांगितलं जातं. नीला करोली बाबा यांचं ११ सप्टेंबर १९७३ साली निधन झालं.

Vamika: वृंदावनच्या आश्रमातील विराट-अनुष्काच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल!

अनेक सेलिब्रीटी पोहोचले दर्शनासाठी स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा निल करोली बाबा यांच्या आश्रममध्ये पोहोचले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते. यावेळी विराट आणि अनुष्का यांच्यासोबत मुलगी वामिका कोहली देखील होती.

विराट आणि अनुष्का यांच्याआधी फेसबूकचे फाउंडर मार्क झुकरबर्ग आणि अमेरिकन उद्योगपती स्टीव जॉब्स यांनी देखील निल करोली बाबा यांच्या आश्रमला भेट दिली आहे. ज्यामुळे निल करोली बाबा तुफान चर्चेत आले होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच