AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेया घोषाल ना नेहा कक्कर, ही आहे देशातली सर्वाधिक श्रीमंत गायिका, नेटवर्थ ऐकून…

Richest Female Singer Of India : भारतात सर्वाधिक संपत्ती असलेली महिला गायिका अवघ्या 34 वर्षांची असून तिने एकाहून एक अशी हिट गाणी दिली आहेत. ही गायिका 200 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. तुम्हाला माहीत आहे का तिचं नाव ?

श्रेया घोषाल ना नेहा कक्कर, ही आहे देशातली सर्वाधिक श्रीमंत गायिका, नेटवर्थ ऐकून...
देशातली सर्वाधिक श्रीमंत गायिका कोण ?Image Credit source: social media
| Updated on: Dec 07, 2024 | 3:05 PM
Share

भारतात गुणवंत कलाकारांची विशेषत: उत्तमोत्र गायकांची काही कमी नाही. देशातील तरूण आणि गुणवान गायिकांचा विषय निघताच श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, नेहा कक्कर, अरिजित सिंग यांच्या नावाचा लगेच उल्लेख होतो. त्या गायकांनी आपली कला आणि मेहनतीच्या बळावर एकाहून एक सरक गाणी गात आपला मोठा फॅन बेस बनवला आणि त्यासोबतच भरपूर पैसाही कमावला. ए. आर. रहमान हा भारतातील सर्वात श्रीमंत गायक आहे ज्याची एकूण संपत्ती 1728 कोटी रुपये आहे. पण देशातील सर्वात श्रीमंत महिला गायिका कोण आहे तुम्हाला माहित आहे का ?

सर्वात श्रीमंत गायिका असं म्हणताच अनेकांच्या डोक्यात सुनिधी चौहान, श्रेया घोषाल किंवा नेहा कक्कर यांचा नाव डोळ्यासमोर आलं असेल. पण या तिघींपैकी कोणीच या यादीत अव्वल स्थानी नाहीये. भारतात सर्वात जास्त संपत्ती असलेली, महिला गायिका अवघई 34 वर्षांची असून तिने एकाहून एक अशी हिट गाणी दिली आहेत.

210 कोटींची मालकीण आहे ही गायिका

ही गायिका कोणी दुसरी तिसरी नसून भारतीय प्लेबॅक सिंगर, रेडिओ जॉकी आणि संगीतकार तुलसी कुमार ही आहे. तुलसी ही T-Series च्या मालकांच्या कुटुंबातील एक असून तिच्याकडे अफाट संपत्ती आहे. तुलसी कुमार T-Series च्या YouTube चॅनेल Kids Hut ची मालकही आहे. ती तिच्या प्रत्येक गाण्यासाठी 7 ते 10 लाख रुपये आकारते. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, तुलसी कुमार हिची एकूण संपत्ती 210 कोटी रुपये आहे.

या दिग्गजांना दिली मात

तिच्याकडे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीमुळे तुलसी कुमार भारतातील सर्वात श्रीमंत गायिका बनली आहे. तिने अनेक दिग्गज गायकांना मात दिली आहे. तुलसीनंतर श्रेया घोषाल ही भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला गायिका आहे. रिपोर्ट्सनुसार श्रेया घोशाल हिचे नेटवर्थ 180 ते 185 कोटी इतके आहे. तर तिसऱ्या स्थानी आहे प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान, तिचे नेटवर्थ 100 ते 110 कोटी रुपये इतके आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.