AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्माचा पूर्व पती संजय कपूरची करोडोची प्रॉपर्टी कुणाला मिळणार? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या पत्नीला?

करिश्माचा पूर्व पती संजय कपूरची संपत्ती ही तिच्या पेक्षा 100 पट आहे. आता त्याच्या निधनानंतर ही संपत्ती कोणाला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

करिश्माचा पूर्व पती संजय कपूरची करोडोची प्रॉपर्टी कुणाला मिळणार? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या पत्नीला?
Karishma Kapoor Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2025 | 12:45 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि व्यावसायिक संजय कपूर आता या जगात नाहीत. पण त्याने आपल्या मागे केवळ एक प्रभावी व्यावसायिक साम्राज्यच नाही, तर कोट्यवधींची संपत्तीही सोडली आहे. संजय कपूरचे नाव अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. पण व्यावसायिक विश्वातही ते एक सुप्रसिद्ध चेहरा होता. आता त्याची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण संजयने आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. चला जाणून घेऊया…

करिश्मापेक्षा 100 पटीने जास्त होती संजयची संपत्ती

माध्यमांच्या अहवालांनुसार, संजय कपूरची संपत्ती करिश्मा कपूरपेक्षा जवळपास 100 पटीने जास्त होती. तो सोना ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक होता, जो ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मिती आणि पुरवठ्यात मोठे नाव आहे. या ग्रुपचा व्यवसाय देश-विदेशात पसरला आहे. याशिवाय त्याने रिअल इस्टेट आणि फॅशन इंडस्ट्रीतही गुंतवणूक केली होती.

वाचा: करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरची एकूण संपत्ती किती? मुलांसाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचा

कोणत्या पत्नीला मिळणार संपत्ती?

संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि व्यावसायिक महिला आहे. असे सांगितले जाते की संजय यांनी आपल्या निधनापूर्वीच एक मृत्युपत्र तयार केले होते, ज्यामध्ये त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती प्रियाच्या नावे केली. ही संपत्ती कोट्यवधींची आहे, ज्यामध्ये लक्झरी कार, रिअल इस्टेट, शेअर्स आणि कौटुंबिक व्यवसायातील हिस्सा यांचा समावेश आहे.

पहिल्या दोन विवाहांपासून अंतर

संजय कपूरचा पहिला विवाह डिझायनर नंदिता माहतानीसोबत झाला होता, जो फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्याने करिश्मा कपूरशी लग्न केले. करिश्मा आणि संजयला दोन मुलेही आहेत. मात्र, हे नातेही घटस्फोटावर संपले. प्रिया सचदेवशी लग्नानंतर त्याचे कौटुंबिक जीवन काहीसे स्थिर झाले होते.

व्यवसायात मजबूत पकड

संजय कपूरच्या नेतृत्वाखाली सोना ग्रुपने जी वाढ झाली ती व्यावसायिक जगतात एक उदाहरण आहे. त्याच्या जाण्याने केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर उद्योगालाही मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?