मोठ्यांनाच नव्हे तर लहानांनाही अमिताभ बच्चन का करतात हात जोडून नमस्कार? अमिताभ यांच्या या शैलीमागे काय दडले रहस्य
KBC Amitabh Bachchan: समोरच्या व्यक्तीचे वय कोणतेही असो, ते लहान असो की मोठे अमिताभ बच्चन सर्वांसमोर हात जोडून म्हणतात, 'प्रणाम करता हूं मैं आपकोsss..' शतकातील महान नायकाला हात जोडून अभिवादन करताना समोरची व्यक्ती गदगद होते.

KBC Amitabh Bachchan: सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील अभिनेते आणि अभिनेत्री आजच्या पिढीतील अनेकांना माहीत नसतील. परंतु त्याला अपवाद बिग बी अमिताभ बच्चन आहेत. 82 व्या वर्षी अमिताभ बच्चन सक्रीय आहेत. आजच्या पिढीला आकर्षित करत आहेत. ज्या प्रमाणे सत्तरीच्या दशकात अमिताभ यांच्या चित्रपटांची क्रेझ होती, त्याप्रमाणे आजही त्यांच्या कार्यक्रमाची क्रेझ आहे. ‘कौन बनेगा करोड़पति’मधून गेल्या 25 वर्षांपासून अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर सक्रीय आहेत. ते आपल्या अनोख्या जादूई शैलीने लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना आकर्षित करत आहेत. त्यांचे या मालिकेतील शब्द अनेकांच्या तोंडावर असतात. ‘देवी जी’, कम्प्यूटर जी, कम्प्यूटर महाशय, लॉक किया जाए, ताला लगा दिया, महोदय, प्रणाम करता हूं मैं आपकोsss. या शब्दांबरोबर आणि शैलीने अमिताभ बच्चन यांनी सर्वांचा ह्रदयात स्थान मिळवले आहे. ...
